भाच्याला पाहून नेटकऱ्यांना आली तरूणपणातल्या अजय देवगणची आठवण; म्हणाले; `हा दूसरा सिंघम`
Aman Devgan: अजय देवगणची सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. आता त्याचा भाचाही नव्या चित्रपटातून डेब्यू करण्याची शक्यता आहे. सध्या तो एका अवोर्ड फॅक्शनच्या निमित्तानं स्पॉट झाला होता. त्यामुळे त्याची जोरात चर्चा होती. त्याच्या लुक पाहून सर्वांनी त्याला तरूणपणातील अजय देवगणशी कंपेअर केलं आहे.
Aman Devgan: अजय देवगणची कायमच चर्चा रंगलेली असते. परंतु तुम्ही त्याच्या भाच्याला कधी पाहिलं आहे का? त्याचा भाचा हा त्याच्यापेक्षाही फारच रूबाबदार आणि हॅण्डसम दिसतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सध्या काजोलसोबत तो एके ठिकाणी स्पॉट झाला होता. यावेळी त्याचा लुक पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार तो आता लवकरच अजय देवगण सोबत एक्शन फिल्ममध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे.
अजय देवगणची बहीण नीलम याचा मुलगा अमन देवगण हा अगदी त्याच्यासारखा दिसतो आहे. किंबहूना त्याच्यापेक्षाही खूपच सुंदर दिसतो आहे. मामा अजय देवगण याच्याहीपेक्षा हॅण्डसम असा अमन हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता त्याच्या या स्टाईलचे नेटकऱ्यांकडून प्रचंड कौतुक होताना दिसते आहे. एका अवोर्ड फंक्शनमध्ये तो आपली मामी काजोलसोबत स्पॉट झाला होता.
हेही वाचा : 'नग्न झाल्यावर चित्रपटात...' नेटकऱ्याच्या नको त्या कमेंटवर मिताली मयेकरचं सडेतोड उत्तर
त्यांची हेअरस्टाईल पाहून नेटकऱ्यांना जून्या अजय देवगणची आठवण झाली आहे. यावेळी त्यानं ब्लू कलर शर्टसोबत ब्लॅक सूट परिधान केला होता. तर काजोलनं ब्लॅक कलरचा बॉडी हगिंग ड्रेस घातला होता. यावेळी त्या दोघांनी आपल्य पापाराझींना सुंदर अशी पोझ दिली होती. यावेळी तो या लुकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
असंही समोर आले आहे की रॉक ऑन, काय पो छे आणि केदारनाथ अशा चित्रपटांचे दिग्दर्शक केलेले डायरेक्टर अभिषेक कपूर यांच्यासोबत तो डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. यावेळी असंही कळते आहे की त्याला एका नव्या चेहऱ्याची गरज होती तेव्हा अजयसोबत त्यानं त्याला साईन केले आहे. यातून त्याची हिरोईन म्हणून रवीना टंडनची मुलगी राशा थडानी डेब्यू करणार असल्याचेही कळते आहे. काही दिवसांपुर्वी सनी देओलचा मुलगा राजवीर देओल आणि पुनम ढिल्लोनची मुलगी पालोमा ढिल्लोन यांचा दोनो हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा या दोघांचीही बरीच चर्चा रंगलेली होती.