'नग्न झाल्यावर चित्रपटात...' नेटकऱ्याच्या नको त्या कमेंटवर मिताली मयेकरचं सडेतोड उत्तर

Mitali Mayekar Trolled: मिताली मयेकरची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यातून सध्या ती ट्रोलर्सच्याही रडारवर आहे. सध्या तिला फार मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येते आहे. सध्या तिच्या अशाच एका कमेंटवर नेटकऱ्यानं विचित्र अन् नको ती कमेंट केली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 1, 2023, 06:08 PM IST
'नग्न झाल्यावर चित्रपटात...' नेटकऱ्याच्या नको त्या कमेंटवर मिताली मयेकरचं सडेतोड उत्तर title=
mitali mayekar slams netizens for his negetive comment on her photo

Mitali Mayekar Trolled: अभिनेत्री मिताली मयेकर हिची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगलेली असते. नेटकरी तिच्या फोटोंवरती काहीबाही कमेंट् करतात आणि मग त्याला योग्य ते प्रत्यूत्तर देतानाही ती दिसते. सध्या तिच्या अशाच एका फोटोवर नेटकऱ्यानं नको ती कमेंट केली ज्यावर मितालीनं योग्य ते उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रींना अनेकदा ट्रोल केले जाते आणि त्यामुळे त्यांची अनेकदा जोरात चर्चा रंगलेली असते. अनेकदा त्यांच्या कपड्यांवरुन त्यांना सपाटून ट्रोल करण्यात येते. बिकीनी परिधान करण्यावरून त्यांना ट्रोल करण्यात येते. मितालीला तिच्या बिकीनी फोटोंवरून अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. सध्या तिची आणि नेटकऱ्यांची चांगलीच जुंपली आहे. मिताली आपला एक नवा फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावरती अशीच एक कमेंट केल्यामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले आहेत. 

त्यावर मितालीनं सडेतोड उत्तरही दिलं आहे. यावेळी तिच्या या उत्तरानं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या फोटोवर एकानं नग्न झाल्यावर चित्रपटात काम मिळतं का? अशी कमेंट केली आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चा रंगलेली आहे. यावर मितालीनं माहिती नाही बुवा! बघा प्रयत्न करून अशी कमेंट करत नेटकऱ्यालाच गप्प केलं आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. याआधीही तिच्या फोटोंवरती नानाविध कमेंट्स केल्या होत्या. तिला फार वाईट पद्धतीनं ट्रोल करण्यात आले होते. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली असायची. आताही तिची चर्चा रंगलेली असते. मध्यंतरी तिचे बिकीनीतले फोटो प्रचंड व्हायरल झाले होते त्यामुळे तिला फार ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. 

हेही वाचा : 'मी घरी बसून होतो आणि माझी पत्नी कामावर..' बॉबी देओल स्ट्रगल परियड आठवून भावूक

मिताली मयेकर ही अनेकदा जगभ्रमंती करताना दिसते त्यामुळे अनेकदा चर्चा असते. त्यावरूनही तिला अनेकदा ट्रोल करण्यात येते. ना चित्रपट ना मालिका मग पैसे येतात कुठून यावरूनही तिला ट्रोल करण्यात होते. त्यामुळे तिची विशेष चर्चा रंगलेली होती. त्यावरही तिनं चोख प्रत्यूत्तर दिले होते. 

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची जोरात चर्चा असते. सध्या त्यांच्या केमेस्ट्रीवरही बरीच चर्चा रंगलेली असते. सोशल मीडियावरही ते दोघं फारच एक्टिव आहेत. त्यांच्या फोटोंचीही जोरात चर्चा रंगते. आता पुढील वर्षी जानेवारीत त्यांच्या लग्नाला 3 वर्षे पुर्ण होतील.