मुंबई : अजय देवगन, म्हणजेच बॉलिवूडचा सिंघम, जो त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच स्टंट्सची खूप आवड आहे. त्याने सुरुवातीच्या चित्रपटात अनेक स्टंट दाखवले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? की अजयच्या आयुष्यातही अजय देवगणने अशीच अनेक कामे केली आहेत. तो नुक्कड टोळीचा प्रमुख होता. होय ... द कपिल शर्मा शोमध्ये अजय देवगणसोबत पाहुणे म्हणून आलेल्या अभिषेक बच्चनने स्वत: हे रहस्य उघड केलं होतं. तो नुक्कड टोळीचा लीड असून ओपन जीपमध्ये जबरदस्त स्टंटही करायचा असं त्याने सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओपन जीपमध्ये स्टंट करायचा
अभिषेक बच्चन आणि अजय देवगन हे दोघे जेव्हा द कपिल शर्मा शोमध्ये गेस्ट म्हणून आले तेव्हा तिथे बरीच मजा आणि मस्ती त्यांनी केली. याच शो दरम्यान अभिषेकने एक किस्सा शेअर केला की, जेव्हा तो बॉलिवूडमध्ये नव्हता तेव्हा तो 'प्रतिक्षा' बंगल्याजवळ नुक्कडवर एक गँग होती, ज्या गँगचा प्रमुख अजय देवगन होता.


तेव्हा अजय देवगण कॉलेजमध्ये शिकत होता. तो बर्‍याचदा ओपन जीपमध्ये फिरताना दिसायचा आणि बरेच स्टंटही करायचा. त्याचवेळी अभिषेक बच्चनने हे देखील सांगितलं की, अजयने कॉलेज पूर्ण केलं तेव्हा अभिषेक, हृतिक आणि गोल्डी बहल यांनी त्या टोळीची पुढची पिढी म्हणून स्वत: ला तयार केलं होतं. त्याने स्वत: स्टंट करण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे त्यालाही दुखापतही झाली.


कपिल शर्माने विचारला मजेदार प्रश्न
कपिलने शोमध्ये पोहोचलेल्या अजय देवगणलाही एक अतिशय मजेदार प्रश्न विचारला होता, ज्यावर प्रत्येकजण हसताना दिसले होते. कपिलनं विचारलं की, ग्रँण्ड एन्ट्रीमुळे तुम्ही कधी घरात पॅराशूट घेऊन प्रवेश केला आहे का? सुरुवातीला अजयलाही हा प्रश्न ऐकून धक्का बसला, पण नंतर त्याने देखील मजेदार उत्तर दिलं.