...म्हणून सलमान ऑनस्क्रीन कधीच Kiss करत नाही
पाहा कोण आहेत हे सेलिब्रिटी
मुंबई : कोणताही कलाकार असो त्याच्यासाठी स्क्रिप्ट ही सगळ्यात महत्त्वाची असते. कलाकारांना स्क्रिप्टप्रमाणे सर्वकाही करावं लागतं. मग त्यात इंटिमेट सीन असो किंवा मग किसिंग सीन. पण तरीही बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी पडद्यावर किस करण्यास स्पष्ट नकार दिला. या लिस्टमध्ये सलमानपासन अनेक लोकप्रिय कलाकारांची नावं आहेत.
अजय देवगन : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) गेल्या 32 वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करत आहे. या 3 दशकात अजयनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं ज्यामध्ये खूप रोमँटिक सीन्सही होते. पण अनेक वर्षांपासून अजयने नो किसिंग पॉलिसी अवलंबली आहे. तो पडद्यावर किस करत नाही.
बातमीची लिंक : स्ट्रॅपलेस ड्रेस परिधान करणं अभिनेत्रीला पडलं महागात, कॅमेरा समोर येताच...
अली जफर: अली जफर (Ali Zafar) हा पाकिस्तानी अभिनेता असून त्यानं बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीनं 'लंडन पॅरिस न्यूयॉर्क' या चित्रपटात आदिती राव हैदरीसोबत किसिंग सीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर हा सीन बॉडी डबलसह चित्रित करण्यात आला.
असिन : साऊथची टॉप अभिनेत्री बनल्यानंतर अभिनेत्री असिन (Asin) बॉलिवूडकडे वळली आणि ती सलमान खानपासून ते आमिर खानपर्यंत हिरोईन बनली पण तिने हे धोरणही तिच्या करारात ठेवले आणि नेहमीच किस करणं टाळलं.
आणखी वाचा : 46 वर्षांच्या अमिषा पटेलनं बिकिनीमध्ये शेअर केला बोल्ड व्हिडीओ, पाहून नेटकरी हैराण
सनी लिओन : हे नाव वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. पण जर मीडिया रिपोर्ट्सनुसार, सनीने (Sunny Leone) तिच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नो किसिंग पॉलिसी अवलंबली कारण तिला पडद्यावर कोणत्याही अभिनेत्याला किस करताना अस्वस्थ वाटतं.
सोनाक्षी सिन्हा : सोनाक्षी सिन्हानं (Sonakshi Sinha) सलमान खानसोबत 'दबंग' चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. सोनाक्षीनं चित्रपटात इंटिमेट सीन्स दिले तरी नो किसिंग पॉलिसीबाबत तिची भूमिका स्पष्ट आहे. तिने कॅमेऱ्यासमोर कोणत्याही स्टारला किस करण्यास नकार दिला आहे.
आणखी वाचा : 'मी पक्षात प्रवेश...', शिंदे गटासोबत व्यासपीठावर दिसताच अवधूत गुप्तेची लक्षवेधी पोस्ट
शिल्पा शेट्टी : शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) गेल्या 3 दशकांपासून मोठ्या पडद्यावर दिसते. पण इतक्या वर्षात शिल्पानं एकाही स्टारला पडद्यावर किस केलेलं नाही. तिनं नो किसींग पॉलिसी तिच्या करारात ठेवली आहे.
आणखी वाचा : प्रायव्हेट पार्टपासून विवस्त्र होण्यापर्यंत...'या' अभिनेत्रींकडे साजिद खानच्या विचित्र मागण्या
सलमान खान : अभिनेता सलमान खानही (Salman Khan) पडद्यावर किस करत नाही. त्याच्या चित्रपटांमध्ये भरपूर रोमान्स दिसला तरी तो चित्रपटांमध्ये किसींग सीन देताना दिसत नाही.