मुंबई : तुम्हाला हवेत उडणारी ती 'टार्झन कार' आठवतेय का? २००४ साली अजय देवगनचा टार्झन द वंडर कार हा सिनेमा प्रदर्शित झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमात वापरण्यात आलेली कार नुकतीच एका सामान्य मुलाने खरेदी केली आहे. काय आहे हा नेमका प्रकार. विक्रम आदित्य शुक्ला या व्यक्तीने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर या कारचा फोटो शेअर केला आहे. या मुलाने आपल्या क्लोज्ड ग्रुप एक्सडीए ऑफ टॉपिक ग्रुपमध्ये या कारचा फोटो शेअर केला आहे. २००४ मध्ये अजय देवगन, वत्सल शेठ आणि आएशा टिकाया यांच्या सिनेमात ही टार्झन कार देखील आपल्याला पाहायला मिळाली होती.


या सिनेमाची गोष्टी या टार्झन कारशीच निगडीत होती. ही कार १९९१ मध्ये आलेल्या टोयोटा एमआर २ वर आधारित होती. वीकिपीडियाच्या माहितीनुसार हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. आणि त्यामुळेच ही कार लाँच होऊ शकली नाही. या कारची तुलना २००४ च्या मित्सुबिशी एक्लिप्स आणि फरारी ३४८ सोबत करण्यात आली.





सिनेमाच्या अपयशामुळे ही कार आता भंगारमध्ये पाहायला मिळत आहे. हा सिनेमा अजय देवगन, फरीदा जलाल आणि वत्सल सेठ यांच्यावर आधारित होता. अजय देवगन देवेनची भूमिका साकारत होता. जो मुलगा सिनेमात आपला अधिक वेळ एक अॅडव्हान्स कार तयार करण्यात घालवत असे. त्याने एसयूवी बनवून त्याचे पेटेंट देखील खरेदी केले होते. त्यानंतर ती कार कशी देवेनच्या हातून निसटून जाते हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे.