अभिनेता अजय देवगनने केला मोठा खुलासा
बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगन सध्या आपल्या `रेड` या सिनेमाचं प्रमोशन करण्यात बिझी आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेता अजय देवगनने मोठा खुलासा केला आहे.
नवी दिल्ली : बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगन सध्या आपल्या 'रेड' या सिनेमाचं प्रमोशन करण्यात बिझी आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेता अजय देवगनने मोठा खुलासा केला आहे.
आयकर अधिकाऱ्याच्या भूमिकेत
'रेड' सिनेमातील अभिनेत्री इलियाना डिक्रूज सोबत अजय देवगन आपल्या सिनेमाचं प्रमोशन करत आहे. या सिनेमात अजय देवगनने एक आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.
मोठा खुलासा
या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी दिल्लीत दाखल झालेल्या अजयने सांगितले की, एकदा माझ्याही घरी आयकर विभागाने धाड टाकली होती.
अजयने सांगितले की...
न्यूज एजन्सी आयएएनएसच्या मते, अजय देवगनने प्रसारमाध्यमांसोबत बोलताना म्हटलं की, "होय, हे खरं आहे की १९९० च्या दशकात माझ्याही घरी छापा पडला होता. त्यावेळी मी घरी नव्हतो आणि अधिकाऱ्यांना माझ्या घरी काहीच मिळालं नाही."
सिनेमात अजय देवगनने अमय पटनायकची भूमिका केली आहे. यावेळी अजय देवगनने सांगितले की, अमय पटनायक काय करतो हे तुम्हाला पहायला मिळेल. तसेच तो आपला परिवार, प्रामाणिकपणा आणि देश प्रेमासाठी जीवही देण्यासाठी तयार आहे.
अजय देवगन आणि एलियाना डिक्रूज हे दुसऱ्यांदा एका सिनेमात पहायला मिळणार आहेत. 'रेड' सिनेमापूर्वी या दोघांनी 'बादशाहो' या सिनेमात एकत्र काम केलं आहे. 'रेड' हा सिनेमा १६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.