मुंबई : बॉलिवूड स्टार अजय देवगण आणि काजोलची लाडकी मुलगी न्यासा देवगण सध्या कमालीची चर्चेत आहे. न्यासा देवगन तिच्या फॅशनमुळे सगळ्यांचं लक्षवेधून घेते.सध्या न्यासा तिचे शिक्षण स्वित्झर्लंडमध्ये घेत आहे. यादरम्यान तिचे काही फोटो समोर आले आहेत. न्यासा अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणजे न्यासाचा फोटो तिने स्वतःने नाही तर सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने शेअर केला आहे.  काजोलची मुलगी ग्लॅमरस फोटोमध्ये पोज देताना दिसत आहे.


मनीषने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, 'मनीष मल्होत्राचे न्यू-एज ऑर्डर डिफ्यूज ट्राइबमध्ये न्यासा देवगण....' असं लिहिलं आहे. सध्या सोशल मीडियावर न्याचा फोटो व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र तिच्या फोटोची चर्चा आहे.