मुंबई : बॉलिवूडचा 'सिंघम' अभिनेता अजय देवगनचा जन्म २ एप्रिल १९६९ रोजी दिल्ली मध्ये झाला. आपल्या दमदार अभिनयाने अजय देवगणने प्रत्येक भूमिका चोख पार पाडली. त्याला दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. अभिनयात परिपूर्ण असण्या व्यतिरिक्त तो त्याचा पर्सनल आयुष्यही खूप परिपूर्ण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजय देवगण आणि काजोल बॉलिवूड कॉरिडोरचं परिपूर्ण जोडपं आहे. दोघांच्या लग्नाला 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. 24 फेब्रुवारी 1999ला अजय आणि काजोलने सात फेरे घेतले. पण तुम्हाला हे महिती आहे का की, काजोलला पहिल्यांदा भेटल्यावर अजयने काजोलला नापसंत केलं होतं.


अजय आणि काजोल पहिल्यांदा सेटवर भेटले. यानंतर १९९९ मध्ये हे दोघं हलचल सिनेमांत दिसले. या दोघांची पहिली भेट काही खास नव्हती. एकीकडे अजयचा स्वाभाव शांत होता तर दुसरीकडे, काजोल खूप चुलबुली होती. काजोलला पाहून अजय खूप निराश झाला होता, इतकंच नाही तर, पुन्हा काजोलला भेटण्यासाठी तो उत्सुकही नव्हता.


असं म्हणतात की, अजय हलचल' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान करिश्माला कपूरला डेट करत होता. तर दुसरीकडे काजोल अनेकदा अजयसोबत तिच्या एक्स बॉयफ्रेंन्डबद्दल गप्पा मारत बसायची. ईथूनच दोघांमध्ये गप्पा टप्पा सुरू झाल्या. आणि मग त्या दोघांनीही ऐकमेकांना डेटिंग करायला सुरवात केली. काजोलला अजयची सत्यता खूप जास्त आवडते.


अजय देवगन आणि काजोलने ऐकमेकांना दोन वर्ष डेट केल्यानंतर. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यांनी घरच्या घरी छुप्या पद्धतीने लग्न केलं. ज्यामध्ये परिवार आणि जवळचे मित्र उपस्थित होते. त्यांना नीसा आणि युगा ही दोन मुलं आहेत.


हे दोघंही पहिल्यांदा 'हलचल' या सिनेमांत 1995मध्ये एकत्र दिसले. यानंतर या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करण्याची संधी दिली. या दोघांनी 'गुंडाराज', 'इश्क', 'प्यार तो होना ही था', 'दिल क्या करे', 'राजू चाचा' आणि 'यू मी और हम' सारख्या चित्रपटांचा सिनेंमांत एकत्र काम केलं.