Ajay Devgan : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि अभिनेत्री काजोल (kajol) यांची मुलगी न्यासा देवगण (Nysa Devgn) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. असाच आता तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ती जबरदस्त डान्स करताना दिसली आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : 'गंदी बात' फेम Anveshi Jain चा बोल्ड VIDEO आला समोर


अजय देवगणची (Ajay Devgn) मुलगी न्यासा देवगणने (Nysa Devgn) अद्याप बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली नाही, परंतु तिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. न्यासाचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, ज्यामध्ये तिचा स्टनिंग लूक दिसत आहे. आता न्यासाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. न्यासा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे. 


हे ही वाचा :  फोटोत चिमुकला आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का? 


पोस्टमध्ये काय?


न्यासाचा (Nysa Devgn) मित्र ओरहान अवत्रामणीने थँक्सगिव्हिंग डिनरचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक स्टारकिड्स सहभागी झाले होते.ओरहानने त्याच्या इंस्टाग्रामवर या डिनरचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये न्यासा (Nysa Devgn) रेड स्टायलिश टॉप आणि डेनिम स्कर्टमध्ये दिसत आहे. फोटोंमध्ये ती तिच्या मित्रांसोबत डिनर एन्जॉय करताना दिसली. ती ओरहानसोबत पोज देतानाही दिसली आहे. 


व्हिडिओत काय?


ओरहान अवत्रामणीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये न्यासा (Nysa Devgn) डान्स करताना दिसत आहे. ती तिच्या मैत्रिणींसोबत गाण्यावर नाचताना दिसली आहे. या व्हिडिओवर खुशी कपूरने लिहिले, 'मिस यू माय फेव्हरेट आयकॉन, असी कमेंट केली आहे. तर जान्हवी कपूरने 'मिस यू बेबी, असे लिहले आहे. अनेक युझर्स यावर कमेंट करत आहेत. 



दरम्यान न्यासाचा (Nysa Devgn) हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. त्यात न्यासाचे वडिल म्हणजेच अजय देवगण (Ajay Devgn) याचा दृष्यम 2 (Drishyam 2) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना खुप आवडला आहे. सध्या हा सिनेमा बक्कळ कमाई करतो आहे.