मुंबई : बॉलीवूड स्टार अजय देवगणने नुकताच पॅरिसमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत ४९वा वाढदिवस साजरा केला. कुटुंबासोबतच बॉलीवूडच्या या हिरोला त्याच्या फॅन्सनेही खूप शुभेच्छा दिल्या. मात्र पॅरिसमधीरल अजय देवगणने असा एक फोटो शेअर केलाय जो पाहून त्याचे फॅन्स जाम भडकले. अजय देवगणच्या या ट्रिपमध्ये त्याची पत्नी काजोल, मुलगी न्यासा आणि मुलगा युगही होता. यासोबतच अजयची ऑनस्क्रीन मुलगी इशिताही उपस्थित होती. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजयने पॅरिसमध्ये आपल्या मुलासोबतचा फोटो शेअर केला. या फोटोत अजय देवगणच्या हातात सिगारेट दिसतेय. या फोटोवरुन अजयच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आपल्या ७ वर्षाच्या मुलासमोर अजय स्मोकिंग करत असल्याने नेटीझन्सनी त्याच्यावर टीका सुरु केलीये.






अजय देवगणचा २ एप्रिलला बर्थडे होता. १९९१मध्ये आलेल्या फूल और काँटे या सिनेमातून अजयने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. अजयला महागड्या गाड्यांचा शौक आहे. आपल्या सिनेमात स्व:त स्टंट करणारा अजय आजही अॅक्शन इमेजसाठी प्रसिद्ध आहे.