Ajay Devgn's Daughter's Name : बॉलिवूड अभिनेत्री अजय देवगन (Ajay Devgn) आणि काजोलची (Kajol) लेक नीसाही (Nysa) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरते. नीसा ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. नीसा अजून चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. नीसा बऱ्याचवेळा तिच्या मित्र-मैत्रीनींसोबत किंवा मग आई-वडिलांसोबत दिसते. काही दिवसांपूर्वी नीसाचे राजस्थानमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहिजे. दरम्यान, नीसाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावेळी नीसानं तिचं खरं नावं काय आहे, याचा खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीसाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी आणि इन्स्टंट बॉलिवूडनं शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये नीसानं ग्रे रंगाचं टी-शर्ट परिधान केलं असून डेनिम जीन्स परिधान केली आहे. यावेळी नीसा येते तेव्हा तिला पाहताच पापाराझी न्यासा, न्यासा ओरडताना दिसतात. तर गाडीत बसण्याआधी नीसा त्यांना हसत बोलते माझं नाव नीसा आहे. नीसाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आतापर्यंत सगळ्यांना तिचं नावं न्यासा असल्याचे वाटतं होतं. मात्र, अखेर स्वत: नीसानं तिच्या नावाचा योग्य उच्चार सांगितला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


नीसाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'ती सुंदर दिसते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तिचं नाव नीसा नाही नशा आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, न्यासा ऐकायला छान वाटतं म्हणून नीसा बोलत नाही. आणखी एक नेटकरी म्हणाला,'DDLJ 2.0 मध्ये आर्यन आणि नीसाला घेतलं पाहिजे.' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : ...मग अंजलीनं राहुल नाही तर अमनशी लग्न केलं असतं; 24 वर्षांनंतर Kajol नं व्यक्त केली इच्छा


दरम्यान, नीसाचा हा व्हिडीओ वांद्रेच्या एका रेस्टॉरंटमधील आहे. यावेळी नीसाही तिचा मित्र ओरी, मौनी रॉय आणि कोरिओग्राफर तुषार कालियासोबत दिसले. नीसा ही इतर स्टार किड्सप्रमाणे मित्र-मैत्रीणींसोबत पार्टी करताना दिसते. नीसाच्या शिक्षणाविषयी बोलायचे झाले तर सिंगापुरमध्ये ग्लिओन इन्स्टीट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती सध्या स्विट्झरलॅंडमध्ये पुढचं शिक्षण करत आहे. दरम्यान, नीसाचा एक भाऊ आहे. त्याचं नाव युग असं आहे.