मुंबई : बॉलिवूडचा सिंघम आता मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाचे नाव नुकतेच घोषित करण्यात आले आहेत. अजय देवगनच्या या सिनेमाचं नाव 'आपला मानूस' असून या सिनेमांत नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत आहे. अजयने या सिनेमाची घोषणा केल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमाचे पोस्टर आता प्रेक्षकांच्या भेटीस आले असून हे पोस्टर अजय देवगणनेच सोशल मीडियावर लाँच केले आहे. 


अजय देवगणने हे पोस्टर ट्वीट करत एक कॅप्शन लिहिली आहे. या कॅप्शनमध्ये त्याने म्हटले आहे की, हे पाहा आपला मानूस या चित्रपटाचे पहिले पोस्टर. हे पोस्टर पाहून सिनेमाचा अंदाज नक्कीच येत आहे. या सिनेमांत नाना पाटेकर बाईकवर बसलेला असून तो प्रचंड पावसात बाईक चालवताना दिसत आहे. 



नाना पाटेकरचा एक वेगळाच लूक या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. या पोस्टमध्ये हा सैतान बाटलीत मावनारा नाय असे एक वाक्य लिहिले आहे हे वाक्य प्रेक्षकांचे नक्कीच कुतूहल वाढवत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. अजयच्या ट्वीटला अनेकांनी रिट्वीट केले असून अनेकांनी यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


आपला मानूस या चित्रपटाचे दिग्दर्शन सतिश राजवाडे यांनी केले असून अजय देवगणसोबतच नाना पाटेकर देखील या सिनेमाचे निर्माते आहेत. हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.