मुंबई : अभिनेता अजय देवगनने, त्याची पत्नी अभिनेत्री काजोलचा नंबर ट्वीटरवर टाकला आहे, यानंतर अजय देवगन ट्रोल होणं सुरू झालं आहे. काही युझर्स अजय देवगनला पान न खाण्याचा सल्ला देत आहेत. कारण अजय देवगन काही टीव्ही चॅनेल्सवर पान मसाल्याची जाहिरात करताना दिसतात, असं प्रेक्षक म्हणतायत. तर काहींनी अजय देवगनने, काजोलचा जो नंबर टाकला आहे, ते ट्वीट डिलीट करण्याचा सल्ला दिला आहे.


काजोल ही भारतात नाही, तर परदेशी गेली आहे, यासाठी अजय देवगनने तिचा संपर्क नंबर ट्वीट केला आहे, अनेकांनी यावर फोन केला, पण काजोलने फोन न घेता, नो कॉल्स व्हॉटसअॅप ओन्ली असं म्हटलं आहे. काहींनी तर अभिनेत्री सनी लिओनीचा नंबर टाक असं अजय देवगनला म्हटलं आहे.