Ajinkya Deo : मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यांचा लाडका आणि हॅन्डसम अभिनेता म्हणून अजिंक्य देव ओळखला जातो. अजिंक्यनं त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अजिंक्यनं फक्त मराठी नाही तर बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही काम केलं. करिअरमध्ये इतकं सगळं मिळवलेल्या अजिंक्यनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील चढाओढ, स्पर्धा या सगळ्यांवर वक्तव्य केलं आहे. याशिवाय आपलीच माणसं आपल्याकडे कसं दुर्लक्ष करतात हे देखील सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजिंक्य देवनं ही मुलाखत 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिली आहे. या मुलाखतीत अजिंक्यनं चित्रपटसृष्टीतील जवळपास सगळ्याच गोष्टीवर स्पष्ट वक्तव्य केलं आहे. अजिंक्यला यावेळी विचारलं की "एक कलाकार म्हणून आजही संघर्ष हे सुरुच आहे का?" त्यावर उत्तर देत अजिंक्य अमिताभ बच्चन आणि त्याचे वडील रमेश देव यांचा किस्सा सांगत म्हणाला, "नक्कीच 100 टक्के संघर्ष करावा लागतो. मला असलेली एक आठवण सांगतो, एकदा बाबा मला अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी घेऊन गेले. तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, 'आजही तुम्ही इतकं काम करता थोडा आराम करा.' त्यावर त्यांच्या पद्धतीनं उत्तर देत अमिताभ म्हणाले, 'मला माझं घर चालवायचंय रमेश देव जी. त्यामुळे मला काम करावंच लागणार.' हे सांगण्याचा अर्थ असा आहे की एवढे मोठे कलाकार असूनही जर ते हा विचार करत असतील तर त्यांच्यापुढे मी कोण आहे. त्यामुळे संघर्ष हा आजही सुरुच आहे आणि तो सुरुच रहायला हवा." 


पुढे स्टारडम विषयी बोलताना अजिंक्य म्हणाला, "मी स्टारडम कधीच गाठलं नाही. माझ्यावर प्रेक्षकांचं जे प्रेम आहे ते पाहून माझे मित्र किंवा प्रेक्षक मला स्टार म्हणत असतील. मी कोणता मोठा कलाकार नाही हे मला माहितीये. आजही मी लोकांना कामासाठी भेटतो. स्वत: हून त्यांच्याकडे काम मागतो, त्यात मला कोणत्याही प्रकारचा कमीपण वाटत नाही." 


हेही वाचा : सलमान घरावर गोळी झाडणाऱ्याच्या बहिणीचा मोठा खुलासा, म्हणाली - 'एनकाऊंटर करण्याची...'


निर्माते आणि फिल्ममेकर यांच्यातील एकीविषयी बोलताना अजिंक्य म्हणाला, "अगोदर असायचं आता तसं राहिलेलं नाही, आता इंडस्ट्रीमध्ये एकमेकांशी जो संवाद व्हायचा तो होत नसतो. हे बोलताना मला वाईट वाटतंय पण कोणतंही कारण नसताना एकमेकांशी स्पर्धा, चढाओढ असते. आपली माणसं आपल्याकडे काही काळानंतर दुर्लक्षित करतात.