मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देशाच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असतात. पवार कुटुंबीय महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करण्यात देखील शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पण सध्या शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपूत्र जय पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जय पवार यांचा एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकारणी आणि बॉलिवूडकर यांचं नातं काही लांबचं नाही. अनेक राजकारण्यांचे बॉलिवूडमधील लोकांसोबत मैत्रीचे संबंध आहेत. राजकारणी आणि कलाकार एकमेकांना कार्यक्रमात नेहमी आमंत्रण देत असतात. अनेक महत्त्वाच्या प्रसंगी ते एकत्र ही दिसतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



जय पवार (Jay Pawar) आणि अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. हा फोटो दुबईच्या बुर्ज-अल-अरब (Burj al-Arab) येथील असल्याचा दावा केला जात आहे.


अभिनेत्री उर्वशी रौतेला (URVASHI RAUTELA) ही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. अनेक सिनेमांमध्ये तिने काम केले असून तिच्या हातात अनेक प्रोजेक्ट सध्या आहेत. उर्वशी आपल्या फोटोंमुळे इन्स्टाग्रामवर नेहमी चर्चेत असते.