देशातील 1 कोटी तरुणांना दरमहा मिळणार 5000 रुपये, पीएम इंटर्नशिप योजनेसाठी कशी करायची नोंदणी?

काय आहे पीएम इंटर्नशिप योजना? यामुळे तरुणांना कसा फायदा होणार? यासाठी नोंदणी कशी करायची? सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

| Oct 06, 2024, 15:03 PM IST

PM Internship Scheme 2024:काय आहे पीएम इंटर्नशिप योजना? यामुळे तरुणांना कसा फायदा होणार? यासाठी नोंदणी कशी करायची? सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

1/9

देशातील 1 कोटी तरुणांना दरमहा मिळणार 5000 रुपये, पीएम इंटर्नशिप योजनेसाठी कशी करायची नोंदणी?

PM Internship Scheme 2024 Registration Benifits How to Apply Marathi News

PM Internship Scheme 2024: पंतप्रधान शेतकरी योजनेचा 18 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसेही महिलांच्या खात्यात आले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या पीएम इंटर्नशिप योजनेची देशभरात चर्चा आहे.

2/9

सर्व प्रश्नांची उत्तरे

PM Internship Scheme 2024 Registration Benifits How to Apply Marathi News

या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर करताना या इंटर्नशिप योजनेची घोषणा करण्यात आली होती. काय आहे पीएम इंटर्नशिप योजना? यामुळे तरुणांना कसा फायदा होणार? यासाठी नोंदणी कशी करायची? सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. 

3/9

5,000 रुपये इंटर्नशिप भत्ता

PM Internship Scheme 2024 Registration Benifits How to Apply Marathi News

5 वर्षांच्या कालावधीत एक कोटी तरुणांना पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ मिळणार आहे. याअंतर्गत तरुणांना टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे. जिथे त्यांना प्रति महिना 5,000 रुपये इंटर्नशिप भत्ता दिला जाईल. निवड झालेल्या तरुणांना सरकारकडून 4500 रुपये मासिक स्टायपेंड दिले जाते. तसेच कंपन्यांकडून अतिरिक्त 500 रुपये दिले जाणार आहेत.

4/9

पात्रता काय?

PM Internship Scheme 2024 Registration Benifits How to Apply Marathi News

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुण अधिकृत पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या योजनेसाठी उमेदवारांना काही नियमांची पूर्तता करावी लागेल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 21 ते 24 वर्षेाच्या आत असावी.

5/9

घरात सरकारी कर्मचारी नको

PM Internship Scheme 2024 Registration Benifits How to Apply Marathi News

पूर्णवेळ नोकरी न करत असलेला उमेदवार यासाठी पात्र असेल. जर उमेदवाराच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल तरी देखील उमेदवार यासाठी पात्र ठरणार नाही. 

6/9

योजनेसाठी पात्र नाही

PM Internship Scheme 2024 Registration Benifits How to Apply Marathi News

तसेच IIT, IIM सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून शिक्षण घेणारे तरुणदेखील या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.

7/9

इंटर्नशिप कार्यक्रम दोन टप्प्यात

PM Internship Scheme 2024 Registration Benifits How to Apply Marathi News

या योजनेअंतर्गत 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इंटर्नशिप कार्यक्रम दोन टप्प्यात सुरू केला जाणार आहे. 5 वर्षांच्या कालावधीत 1 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.

8/9

12 ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू

PM Internship Scheme 2024 Registration Benifits How to Apply Marathi News

इंटर्नशिपसाठी नोंदणी 12 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू राहील. निवडलेल्या उमेदवारांना 27 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2024 दरम्यान याबद्दल माहिती दिली जाईल आणि कंपन्या 8 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान ऑफर जारी करतील.

9/9

योजनेसाठी 800 कोटी रुपये खर्च

PM Internship Scheme 2024 Registration Benifits How to Apply Marathi News

इंटर्नची पहिली बॅच 2 डिसेंबर 2024 रोजी सुरू होण्याची शक्यता आहे. ही इंटर्नशिप 12 महिने चालेल. या योजनेसाठी 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.