दाक्षिणात्य सुपरस्टार रुग्णालयात दाखल; मेंदूच्या शस्त्रक्रियेविषयी जवळच्या माणसानं सांगितलं...
South Indian Health Update : दाक्षिणात्य सुपरस्टार रुग्णालयात दाखल असून त्याशिवाय त्याच्यावर ब्रेन सर्जरी होण्यावर त्याच्या जवळच्या व्यक्तीनं वक्तव्य केलं आहे.
Ajith Kumar Health Update : तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता अजित कुमारला चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांना त्याची चिंता वाटू लगाली आहे. सोशल मीडियावर ही बातमी खूप व्हायरल होत आहे. तर असा दावा देखील करण्यात आला आहे की त्याची ब्रेन सर्जरी करण्यात आली आहे. आता अजित कुमारच्या मॅनेजरनं त्याची हेल्थ अपडेट दिली आहे. त्यानं सांगितलं की तो रुटिन चेकअपसाठी रुग्णालयात गेला होता. त्यासोबत त्यानं अजितच्या ब्रेन ट्यूमर आणि ब्रेन सर्जरीच्या बातमीची ही अफवा असल्याचे म्हटले.
अजित कुमारचा मॅनेजर सुरेश चंद्रानं सांगितलं की 'ब्रेन ट्यूमरच्या ऑपरेशनची बातमी खरी नाही आहे. तो नियमित जशी तपासणी करतो म्हणजेच त्याचं हे रेग्युलर हेल्थ चेकअप होतं. ही तपासणी करत असताना डॉक्टरांच्या लक्षात आलं की त्याच्या कानाच्या खाली असलेल्या नसा या थोड्या कमकूवत आहेत. अर्ध्या तासाच्या आत त्यांच्यावर संपूर्ण उपचार करण्यात आले. त्याच्याशिवाय त्याच्या मॅनेजरनं पुढे सांगितलं, आता अजित कुमारला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. त्याला आज रात्री किंवा शनिवार सकाळी लवकर डिस्चार्ज देण्यात येईल. त्याच्याविषयी मिळालेली ही अपडेट कळताच अजितच्या लाखो चाहत्यांना थोडा आनंद झाला आहे. आता त्याच्या चाहत्यांना हिच आशा आहे की लवकरच त्याला डिस्चार्ज मिळेल आणि तो सटवर परतेल.
दरम्यान, या आधी अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीनं 'जूम टीवी' ला सांगितलं होतं की परदेशातील यात्रेवरजाण्याआधी अजित आपल्या रुटिन चेकअपसाठी रुग्णालयात गेला होता. परदेशात म्हणजे अजितला अजरबैजान येथे जायचे होते.
हेही वाचा : Women's Day निमित्तानं आलिया भट्टला ते गिफ्ट खरंच राहानं दिलं? ट्रोलर्स म्हणाले, 'इतकी छोटी मुलगी...'
अजित कुमारनं नुकताच त्याच्या मुलीचा 9वा वाढदिवस साजरा केला. ज्याची थीम फुटबॉल होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. अजित विषयी बोलायचे झाले तर तो सध्या मगिज थिरुमेनी दिग्दर्शित 'विदा मुयारची' शूटिंग करत होती. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री तृषा मुख्य भूमिकेत दिसली होती. असं म्हटलं जातं की त्यांची शूटिंग 90 टक्के पूर्ण झाली आहे आणि लवकरच संपेल.