`तू जबाबदार...`, Akanksha Dubey च्या मृत्यूला बॉयफ्रेंड जबाबदार? चाहते असं का म्हणतायत?
Akanksha Dubey नं काल हॉटेलच्या रुममध्ये स्वत: चा जीव संपवला. तिच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्काबसला आहे. आकांशाच्या निधनानंतर तिचा बॉयफ्रेंड समर सिंगनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. समरची पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला जबाबदार ठरवले आहे.
Akanksha Dubey Boyfriend Samar Singh Shares Post : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं (Akanksha Dubey) काल 26 मार्च रोजी आत्महत्या केली आहे. आकांक्षानं आत्म हत्या केल्याच्या काही तासांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. आकांक्षानं घेतलेल्या या मोठ्या निर्णयानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच म्हणजे 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सह कलाकार समर सिंगसोबत (Samar Singh) फोटो शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपचा खुलासा केला होता. त्यासोबत आकांक्षानं समरला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या. आकांक्षानं दिलेल्या या बातमीनं तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला होता. दरम्यान, आता अनेकांना प्रश्न पडला होता की आकांक्षानं इतकं मोठं पाऊल उचलण्याचं कारण लव्ह अॅंगल तर नाही ना? यासगळ्यात आकांक्षाचा बॉयफ्रेंड समरनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
समरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये समरनं 'निशब्द RIP #AkankshaDubey' असं कॅप्शन दिलं आहे. यासोबत त्यानं रडतानाचं इमोजी कॅप्शनमध्ये दिलं आहे. त्यानं आकांशासाठी काहीही लिहिलं नाही यानं तिच्या चाहत्यांना धक्काबसला. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'आकांक्षा तुझ्यावर प्रेम करायची तू तिच्याकडे लक्ष दिलं नाहीस. यात काहीतरी चुकीचं आहे. तिनं इतका मोठा निर्णय घेण्यासाठी तू जबाबदार आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'यासाठी समर सिंग कारणीभूत आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, '26 मार्च रोजी मध्यरात्री 2-2.30 च्या सुमारास इन्स्टाग्रामवर ऑनलाइन आलो होतो. तेव्हा ती लाइव्ह होती आणि आता जी बातमी समोर आली आहे, यावर माझा विश्वास बसत नाही आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'या सगळ्यासाठी तुच जबाबदार आहेस. तू कधीच आनंदी राहणार नाही.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'तिला धोका दिलास, या सगळ्यासाठी तुच कारणीभूत.'
हेही वाचा : काहीही नसताना Parineeti आणि राघवच्या कुटुंबीयांच्या भेटीगाठी, कसली चर्चा सुरुये?
दरम्यान, आकांक्षानं आत्महत्या करण्याआधी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये आकांक्षानं डान्स केला आहे. त्याशिवाय आकांक्षा आत्महत्या करण्याच्या काही तासांपूर्वी ती इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाइव्ह आली होती. त्यावेळी आकांक्षा या लाइव्हमध्ये रडताना दिसली होती. तर कालच आकांक्षाचं 'आरा कभी हारा नहीं' हे गाणं प्रदर्शित झालं होत. या गाण्यात आकांक्षासोबत भोजपुरी लोकप्रिय अभिनेता पवन सिंग आणि शिल्पी राज दिसले होते.