काहीही नसताना Parineeti आणि राघवच्या कुटुंबीयांच्या भेटीगाठी, कसली चर्चा सुरुये?

Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव यांचा गेल्या अनेक दिवसांपासून सतत व्हिडीओ व्हायरल होोत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, राघव यांनी यावर नकार दिला होता. या सगळ्यात आता त्या दोघांच्या कुटुंबामध्ये बोलणं सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.

Updated: Mar 27, 2023, 01:23 PM IST
काहीही नसताना Parineeti आणि राघवच्या कुटुंबीयांच्या भेटीगाठी, कसली चर्चा सुरुये? title=

Parineeti Chopra and Raghav Chadha : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) ही गेल्या काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीचे चर्चेत राहणारे नेता आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत दिसली होती. या दोघांचा फक्त एक व्हिडीओ नाही तर त्यांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत असं म्हणायला देखील सुरु केलं होतं. दरम्यान, आता सोशल मीडियावर अशा चर्चा सुरु झाल्या आहेत की राघव आणि परिणीती या दोघांचा लवकरच साखरपुडा होणार आहे. तर त्यांचं कुटुंबातील लोकांना त्यांच्या नात्यानं काहीही तक्रार नसल्याचं म्हटलं जातं आहे. 

TOI नं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, सध्या त्या दोघांचं कुटुंब हे त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे तारिखची अनाउंसमेंट करण्यास वेळ लागू शकतो. तर त्यांचं कुटुंब यावर चर्चा करत आहेत. कोणत्या मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या लग्नाची किंवा साखरपुड्याची घोषणा होऊ शकते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघव हे एकमेकांना इंग्लंडमध्ये शिकायला होते तेव्हा पासून ओळखतात. 15 वर्षांपूर्वी परिणीतीनं ब्रिटनच्या मॅनचॅस्टर स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. तर राघव यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. परिणीती आणि राघव हे दोघंही त्यांच्या बॅचचे टॉपर होते. काही दिवसांपूर्वी त्या दोघांची पुन्हा एकदा 'भारत यूके आउटस्टॅंडिंग अचीवर्स ऑनर्स' या कार्यक्रमात भेट झाली. या कार्यक्रमात परिणीती आणि राघव या दोघांचाही सन्मान करण्यात आला होता. या सोहळ्यात भारतीय विद्यार्थ्यांचे यश लक्षात घेऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. राघव प परिणीती एकत्र आल्याने दोन्ही कुटुंबं आनंदी आहेत. दरम्यान, राघव यांनी या चर्चां फक्त अफवा असल्याचे म्हटले होते. 

हेही वाचा : फसला! परवानगीशिवाय Ex Girlfriend चा आवाज वापरल्यामुळं लोकप्रिय गायकाला 330 कोटींचा फटका

दरम्यान, परिणीतीसोबत झालेल्या भेटीवर संसदेतून बाहेर पडत असताना राघव यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा राघव म्हणाले, तुम्ही मला राजकारणाविषयी प्रश्न विचारा, परिणीतीविषयी नाही. परिणीतीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकर ‘चमकीला’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय परिणीती खिलाडी कुमार अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) ‘कॅप्सुल गिल’या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.