Akanksha Dubey Death: मृत्यूच्या रात्री आकांक्षा दुबेच्या हॉटेलमध्ये 17 मिनिटं थांबणारा तो `मिस्ट्री मॅन` कोण? पोलिसांचा खळबळजनक खुलासा
Akanksha Dubey Death: आकांक्षा हॉटेलमध्ये (Hotel) पार्टी करून उशिराने 1.55 वाजता पुन्हा आली होती, तेव्हा तिला सोडण्यासाठी एक तरुणही तिच्यासोबत आला होता, अशी माहिती हॉटेल मॅनेजरने (Hotel Manager) दिली होती. त्यावर आता पोलिसांनी मोठा खुलासा केलाय.
Akanksha Dubey Suicide: स्टार भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) हिच्या आत्महत्येने सध्या मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. फक्त 25 वर्षीय (akanksha dubey age) नवोदित अभिनेत्रीने अचानक जगाचा निरोप घेतल्याने अनेकांच्या मनाला चटका बसलाय. अशातच आता आकांक्षाच्या मृत्यूचं रहस्य दिवसेंदिवस अधिकच गुढ होताना दिसत आहे. अशातच आता पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला. आहे. आकांक्षा दुबेच्या हॉटेलमध्ये 17 मिनिट थांबणारा तो 'मिस्ट्री मॅन' कोण? याचा खुलासा करण्यात आलाय.
ज्यावेळी आकांक्षा हॉटेलमध्ये (Hotel) पार्टी करून उशिराने 1.55 वाजता पुन्हा आली होती, तेव्हा तिला सोडण्यासाठी एक तरुणही तिच्यासोबत आला होता, अशी माहिती हॉटेल मॅनेजरने (Hotel Manager) दिली होती. तर आकांक्षा तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती, अशी माहिती देखील आकांक्षाच्या मेकअप आर्टिस्टने (makeup artist) देखील यावर भाष्य केलं होतं.
'मिस्ट्री मॅन' कोण?
पार्टीवरून (Akanksha Dubey Death) आल्यावर आकांक्षा अडखळत होती, तेव्हा एक व्यक्ती तिला खोलीत घेऊन गेला आणि जवळपास 17 मिनिटे तिच्यासोबत खोलीत राहिला. त्यावर आता वाराणसी पोलिसांनी (Varanasi Police) माहिती दिली आहे.
वाराणसी पोलिसांचं म्हणणं काय?
हॉटेलमध्ये पहाटे 2 वाजता आलेल्या व्यक्तीला आकांक्षा ओळखत होती असं वाराणसी पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी या व्यक्तीची ओळख पटवली आणि चौकशी केली. त्यावेळी चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना माहिती दिली आहे. संशयित व्यक्ती हा वाराणसीतील लंका पोलीस स्टेशन परिसरातील टिकरी येथे राहतो. आकांक्षाने या व्यक्तीला लिफ्ट मागितली. त्यामुळे हा व्यक्ती आकांक्षाला सोडायला गेला होता, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
पाहा आकांक्षाची शेवटची पोस्ट -
दरम्यान, आकांक्षा गेल्या अनेक दिवसांपासून नैराश्यात होती. आकांक्षाने याआधी अनेक मोठ्या भोजपुरी चित्रपटांमध्ये (akanksha dubey movies) काम देखील केलंय. आकांक्षाने 'मुझसे शादी करोगी', 'साजन' अशा भोजपूरी सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे सध्या चांदेरी दुनियेत एकच चर्चा होताना दिसत आहे.