आकाश-श्लोकाच्या मेहंदी सोहळ्यात प्रियंकाचा देसी अंदाज
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा जिथे जाते तिथे तिचा जलवा असतो.
मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा जिथे जाते तिथे तिचा जलवा असतो. अमेरिकेतून मुंबईत परतल्यावर बॉयफ्रेंड निक जोनससोबतच्या नात्यामुळे ती चर्चेत होती. त्यानंतर दोघांची डिनर डेट, गोवा व्हेकेशन याच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. बुधवारी प्रियंका चोप्राने मुकेश अंबानींचा छोटा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या मेहंदी सोहळ्यात आपली वर्णी लावली. या सोहळ्यात ही इंटरनॅशनल स्टार देसी गर्ल अंदाजात दिसली.
गोव्यातून परतल्यानंतर प्रियंकाने आकाश अंबानी आणि श्लोक मेहतासोबतचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत प्रियंकाने लिहिले की, आकाशा आणि श्लोकाला शुभेच्छा. एक शानदार सोहळा... मेंहदी है रचने वाली... दोघांनाही प्रेम...
प्रियंकाने या सोहळ्यात फॅशन डिझाईनर तरुण तहलानीची क्रिम कलरची एम्ब्रॉडरीची साडी नेसली होती. तर श्लोका सफेद एम्ब्रॉडरीच्या निळ्या आणि पर्पल रंगाच्या लेहंग्यात दिसली. मुकेश अंबानी यांनी आपल्या मोठ्या मुलाच्या लग्नाची घोषणा याच वर्षी मार्चमध्ये केली होती. आकाश आणि श्लोका लहानपणापासूनचे फ्रेंड्स असून ३० जूनला मुंबईत दोघांचा साखरपुडा होणार आहे. तर याच वर्षी डिसेंबरमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडेल.