मुंबई : दोन वर्षांपूर्वी आलेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला होता. या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीची उंची अधिकच वाढवली. अनेक विक्रम केले. बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी सिनेमा ठरला. केवळ देशभरातच नव्हे तर सातासमुद्रापार असलेल्या प्रेक्षकांनी सैराटवर भरभरुन प्रेम केले. पसंतीची पोचपावती दिली. सैराटची क्रेझ अद्यापही लोकांच्या मनावर कायम आहे. या सिनेमातील डायलॉग, यातील गाणी लोकांच्या तोंडी अजून आहे. सैराट हा सिनेमा कसा घडला, त्यातील नवख्या कलाकारांचा अभिनय, गाणी कशी साकारली गेली याची गोष्ट सैराटच्या नावानं चागभलं यातून दाखवली जातेय. या निमित्ताने सैराटचा मुख्य अभिनेता आकाश ठोसरसोबत एक गेम खेळण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


यावेळी आकाशला काही प्रश्न विचारण्यात आले. आणि उत्तराचे दोन पर्याय त्याच्यासमोर ठेवण्यात आले. या उत्तरापैकी एक उत्तर त्याला द्यायचे होते. सगळ्यात शेवटी प्रश्न विचारण्यात आला की कोणाला डेट करायला आवडेल. यावर आकाश म्हणाला, अजूनपर्यंत कोणाला डेट केलेले नाहीये. मात्र दोघांनाही करायला आवडेल फक्त कोणीतरी भेटले पाहिजे.