मुंबई : अभिनेता कमल हासनची मुलगी अक्षरा हासनचे खाजगी फोटो सोशल मिडियावर लिक झाल्याप्रकरणी मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फोटो लिक प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात अब्रूनुकसान आणि माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या पोलीस हे फोटो खरे आहेत, की त्यांना मॉर्फ करण्यात आलं आहे त्याची शहानिशा करत असून फोटो लिक करण्यासाठी अक्षराचा मोबाईल किंवा लॅपटॉप हॅक करण्यात आला होता का याचा पोलीस तपास करत आहेत.
काही दिवसांपूर्वी अक्षराचे खाजगी फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. असे फोटो लिक झाल्याबद्दल अक्षराने दुख: व्यक्त केलं होतं. सोमवारी तिने सायबर पोलिसांकडे लेखी तक्रार दिली होती त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.


अक्षराचे हे फोटो तिच्या फोनमधून लीक झाले होते. अक्षरा हसनने या प्रकरणात अजून कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. कमल हसनची मुलगी आणि अभिनेत्री अक्षरा हसनचे खासगी फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.


हे फोटो इंटरनेटवर कसे लीक याबाबत अजून कोणताही खुलासा झालेला नाही. पण हॅकरने हे फोटो तिच्या मोबाईलमधून हॅक केल्याचं बोललं जातं आहे. अक्षराने देखील यावर अजून कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. कमल हसन किंवा बहिण श्रृती हसनकडून अजून कोणतंही वक्तव्य आलेलं नाही.