मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार नेहमीच चर्चेत असतो. तर आता तो नागरिकत्वाच्या मुद्यावरून चर्चेत आहे. कॉनडाचे नागरिकत्व असणारा अक्षय अनेकवेळा या मुद्द्यावरून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण आता त्याने भारतीय नागरीकत्वासाठी अर्ज केल्याचे समजत आहे. एका मुलाखती दरम्यान त्याने यासंबंधीत खुलासा केला. त्याचप्रमाणे त्याने कॅनडाचे नागरिकत्व का स्विकारले? याचे देखील स्पष्टीकरण दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमार नेहमी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतो. पण म्हणतात ना आयुष्यात वाईत वेळ प्रत्येकावर येते. तसचं काही अक्षयसोबत झालं होतं. म्हणून त्याने कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारलं असल्याचं सांगितलं. 


दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात अक्षय कुमारने ही माहिती दिली. 'काही परिस्थितीमध्ये मला कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारावे लागले. माझे १४ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सलग अपयशी ठरले. त्यामुळे बॉलिवूड मधील आपली कारकीर्द संपली असे वाटल्यामुळे मी कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले.' असं तो म्हणाला. 


कॅनडामध्ये जाऊन आणखी काही करण्याचा अक्षयचा मानस होता. पण त्याचा १५वा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि अक्षयने मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्याने नागरीकत्व बदलण्याबाबत विचार केला नसल्याचे अक्षयने सांगितले.


त्यानंतर नागरिकत्वाचा वाद सुरू झाल्यानंतर त्याने पासपोर्टसाठी अर्ज केल्याचे सांगितले आहे. नागरिकत्वाच्या प्रकरणामुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवली होती. 


'गुड न्यूज' हा अक्षय कुमारचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह करीना कपूर, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी यांच्याही भूमिका आहेत.