मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहचलेले पाठक बाई आणि राणा दादा खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे झाले आहेत. या दोघांना 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. साध्या सिनेसृष्टीत लग्नसराई सरु आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. तर काही साखरपुडा करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी लवकरचं नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे.  नुकताच खुद्द अक्षयाने आणि हार्दिकने त्यांच्या आयुष्यातील खास क्षणांचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर सांगितलं आहे की, आम्ही फायनली एन्गेज झालो.  पाठकबाई आणि राणादाच्या साखरपुड्यातील एक व्हिडिओ आणि काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये ती एकमेकांच्या हातात अंगठी घालताना दिसत आहे.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हार्दिक सध्या 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेमध्ये सिद्धार्थची भूमिका साकारत आहे. त्याचप्रमाणे अक्षयाने सध्या काही दिवसांसाठी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. तुझ्यात जीव रंगला ही मालिका या दोघांचीही पहिली मालिका होती. अनेकदा हे दोघं एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. साखरपुड्याचे फोटो शेअर करताच अवघ्या काही वेळातचं या दोघांवर चाहत्यांकडून लाईक्स कमेंटचा वर्षाव होत आहे.