Akshay Indikar Post: सोशल मीडियावर सेलिब्रेटींना अनेकदा ट्रोल केले जाते. त्यामुळे त्याची जोरात चर्चाही रंगलेली असते. अनेकदा त्यांच्या पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यांच्या पोस्टचीही बरीच चर्चा ही रंगलेली असते. सध्या अशाच एका अभिनेत्याच्या पोस्टची सध्या जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्याच्या या पोस्टची जोरात चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या देशात चित्रपटातील कलाकारांना आणि मोठ्या सेलिब्रेटींना डोक्यावर घेतले जाते. चाहते हे आपल्या आवडत्या सेलिब्रेटीसाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. म्हणून अशा चाहत्यांमुळे या सेलिब्रेटींचे हे चाहतेच जबाबदार असतात. पण हेच सेलिब्रेटी या चाहत्यांना फारच वाईट वागणूक देतात. त्यांच्याशी नीट वागतही नाहीत. ज्या चाहत्यांनी त्यांना मोठं केलं, लोकप्रियता मिळवून दिली त्यांच्याशी ते फारच वाईट पद्धतीनं वागतात, हे नमूद करणारी पोस्ट मराठमोळ्या दिग्दर्शकानं लिहिलं आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 


''फॅन्स न आवडणाऱ्या सेलिब्रेटी लोकांनी थेट घरी बसावं. तुम्ही सार्वजनिक जीवन निवडताना त्याचे सगळे फायदे हवेत. लोकांनी तुम्हाला डोक्यावर घ्यावं. तुम्हाला लोकांनी आदराचं स्थान द्यावं पण त्याच लोकांनी तुमच्या जवळही येता कामा नये हा विचार हास्यास्पद आहे. भारतात व्यक्तिपूजेची कीड कधीतरी थांबावी. कुणालाच एवढंही डोक्यावर घेऊ नये की त्याच्या माणूसपणाची क्रूर रूपं ओंगळवाणं स्वरूप घेऊन समोर येतील'', अशी पोस्ट सध्या दिग्दर्शक अक्षय इंडिकर यानं लिहिली आहे. 'नेमाडे', 'त्रिज्या-रेडियस', 'स्थलपुराण' अशा सिनेमांसाठी तो ओळखला जातो. 


'उदाहरणार्थ नेमाडे', 'त्रिज्या-रेडियस', 'स्थलपुराण' अशा सिनेमांसाठी तो ओळखला जातो. 'स्थलपुराण' हा चित्रपट 70 व्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये प्रमियर करण्यात आला होता. तो सोलापूरमधील अकलूज शहरातला आहे. तो निर्माता, सिनेमॅटोग्राफर आणि लेखक आहे.  


 


अनेकदा सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. ज्यात कधी फॅन्स सेलिब्रेटींसवेत गैरवर्तन करताना दिसतात किंवा मग सेलिब्रेटी आपुलकीनं त्यांच्यासोबत बोलायला, सेल्फी घ्यायला जातो तेव्हा मात्र काही सेलिब्रेटी हे फार विचित्र अॅटिट्यूडही दाखवताना दिसतात. त्यामुळे त्यांची बरीच चर्चा ही रंगलेली असते. अशावेळी हे सेलिब्रेटी कलाकार हे फार मोठ्या प्रमाणात ट्रोलही होताना दिसतात. त्यामुळे त्यांना नेटकरी हे खडेबोल सुनावतानाही दिसतात. करीना कपूर हिच्या गैरवर्तनावरूनही नारायण मुर्ती यांनी तिला खडसावले होते. ज्याचीही बरीच चर्चा रंगलेली होती. त्यापुर्वी करीनाचे असे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले होते.