मुंबई: अभिनेता अक्षय कुमारची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आज त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकती बिघडल्यामुळे अक्षय कुमारला अचानक रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अक्षयनं स्वत:ला होम क्वारंटाइन केलं होतं. त्यानं आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी कऱण्याचं आवाहन देखील केलं होतं.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक दिवस होम क्वारंटाइन राहिल्यानंतर अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे अक्षय कुमारला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अक्षय कुमारनं काल स्वत: ट्वीट करून कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती.


अक्षय कुमारला मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सध्या ठिक असल्याची माहिती मिळाली आहे. अक्षय कुमार लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. तर या सर्वांचे आभार अक्षय कुमारनं मानले असून मी लवकर परत येईन असा विश्वास व्यक्त केला आहे. 


याआधी सचिन तेंडुलकर, अक्षय पटेल आणि कोहलीच्या संघातील एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अनुपमा सीरियलमधील अभिनेत्रीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. याआधी आलिय भटलाही कोरोनाची लागण झाली आहे. क्रिकेट आणि मनोरंजन विश्वात कोरोनाचं संकट वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.