AAMIR KHAN,AKSHAY KUMAR FIGHT: सोशल मीडियावर सध्या रक्षाबंधन(RAKSHABANDHAN) आणि लाल सिंग चढ्ढा(LAL SINGH CHDHHA) सिनेमाला घेऊन बरीच चर्चा सुरु आहे. दोन्ही सिनेमे 11 ऑगस्ट ला रिलीज होणार आहेत बरेच लोक लाल सिंग चढ्ढा सिनेमाला BOYCOT करण्याची मागणी करत आहेत तर काहीजणांनी या सिनेमाला समर्थन दिलयं पण दोन्ही सिनेमे रिलीज झाल्यांनंतरच कळेल कि कोणता सिनेमा किती हिट होतोय .. 
तुम्हाला माहीत आहे का हे पहिल्यांदा घडत नाहीये या आधीसुद्धा अक्षय कुमार आणि आमिर खान दोघे एकमेकांच्या आमने सामने आलेत ते सिनेमाच्या माध्यमातून ..याआधी बऱ्याच वेळा मोठ्या पडद्यावर आमिर आणि अक्षय यांनी एकमेकांना टक्कर दिली आहे.चला पाहुयात, 


सुहाग-अंदाज अपना अपना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमार(AKSHAY KUMAR ) आणि आमिर खान(AAMIR  KHAN ) यांचा पहिला सामना झाला होता 1994 मध्ये .अक्षय कुमार चा 'सुहाग' आणि आमिरखानचा 'अंदाज अपना अपना' हे दोन सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले होते  यावेळी अक्षय कुमार ने आमिरवर वर मात केली होती त्याचा सुहाग सिनेमा खूप चालला होता तर अंदाज अपना अपना फ्लॉप झाला होता. 
 
 


मैदान ए जंग- बाजी


आमिर आणि अक्षय नुकतेच तेव्हा इंडस्ट्रीमध्ये आले होते. आमिर खानने 'कयामत से कयामत तक' मधून बॉलीवूड मध्ये पदार्पण केलं होत तर अक्षय कुमार ने 'सौगंध' मधून एन्ट्री केली होती. ते साल होतं 1995 च त्यावेळी सुद्धा या दोघांची आमने सामने टक्कर झाली होती यावेळी मात्र आमिर खानचा सिनेमा हिट झाला होता तर अक्षय कुमारचा फ्लॉप . 


 


तारे जमीन पर- वेलकम


2011 मध्ये पुन्हा एकदा या सुपरस्टार्सची टक्कर झाली होती  अक्षय कुमारचा 'वेलकम' आणि आमिरचा 'तारे जमीन पर' सिनेमा एकाच वेळी रिलीज होण्याच्या वाटेवर होते यावेळी दोघांचेही सिनेमे चांगले चालले पण यातही आमिरच्या तारे जमीन पर ला जास्त पसंती देण्यात आली . 


आणि आता पुन्हा एकदा 11 ऑगस्टला दोघांची सिनेमागृहात टक्कर होतीये त्यामुळे आता कोण बाजी मारत कोण हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे..