मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक-निर्मात करण जोहर लवकरच आपल्या चाहत्यांना सरप्राईज देणार आहेत. या सरप्राईजची झलक नुकतीच या दोघांनी सोशल मीडियात शेअर केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की, सलमान खान, करण जोहर आणि अक्षय कुमार एकत्र एक सिनेमा रिलीज करणार आहेत. पण काही कारणांनी यातून सलमानने माघार घेतली. पण अक्षय आणि करण यांनी त्यांच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. 


अक्षय कुमारच्या आगामी सिनेमाचं टायटल ‘केसरी’ आहे. याची माहिती आणि सिनेमाची रिलीज डेट अक्षयने सोशल मीडियात शेअर केली आहे. बॅटल ऑफ सारागढीवर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अनुराग सिंह हे करणार आहे. अक्षयने सांगितले की, तो या सिनेमाबाबत पर्सनली फार उस्ताहीत आहे.



दरम्यान, अजय देवगन सुद्धा बॅटल ऑफ सारागढीवर सिनेमा करणार आहे. त्याच्या सिनेमाचं नाव सन ऑफ सरदार २ असं असेल. या सिनेमाबाबत काही दिवसांपूर्वी अजय म्हणाला होता की, मला हा सिनेमा करायला अजून वेळ आहे. त्याआधी जर कुणाला यावर सिनेमा करायचा असेल तर ते करू शकतात. मला त्यात काहीच अडचण नाहीये.