मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'लक्ष्मी बॉम्ब' (Laxmmi Bomb) बद्दल चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या महिन्यापासून  संपूर्ण देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. यामुळे रूपेरी पडद्यावर एकही सिनेमा दाखल झालेला नाही. लॉकडाऊनचा मोठा फटका अक्षयच्या 'सूर्यवंशी' सिनेमाला बसला आहे. तर आता त्याचा 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमा लॉकडाऊनच्या काळात देखील प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा तुफान रंगत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाहते देखील 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रतिक्षा करत आहेत. परंतु कोरोना व्हायरसचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे या सिनेमाच्या प्रदर्शला ब्रेक लावण्यात आला होता. पण आता 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमा प्रदर्शनासाठी अधिक मेहनत घेतली आहे. निर्माते 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमा डिजीटल माध्यमांवर  प्रदर्शित करण्याच्या मार्गावर आहेत. 


'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमा मोठ्या पडद्या ऐवजी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होणार आहे. यासंबंधी अक्षय कुमार आणि सिनेमाचे दिग्दर्शक राघव लॉरेंस याची ओटीटी कंपनीसोबत बोलणी सुरू आहे. त्यामुळे अक्षयचा हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.


तामिळ चित्रपट 'कांचना'चा रिमेक असणाऱ्या या चित्रपटात अक्षय मध्यवर्ती भूमिकेत आहे. ज्याला एका तृतीयपंथी व्यक्तीच्या आत्म्याने झपाटलेलं असतं असं सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे त्याची ही आगळीवेगळी भूमिका पाहणं चाहत्यांसाठी परवणी ठरणार आहे.