अक्षयसोबत ट्विंकल खन्ना झाली रोमँटिक! आई-बाबांची मुलांना वाटली लाज; म्हणाली- `मुलांना...`
Akshay Kumar And Twinkle Khanna Get`s Romantic : अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना मुलांसमोरच झाले रोमॅन्टिक तर मुलांची होती `अशी` प्रतिक्रिया
Akshay Kumar And Twinkle Khanna Get's Romantic : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. ट्विंकल गेल्या बऱ्याच वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी देखील ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. ती नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसते. आता देखील तिनं सोशल मीडियावर अशी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. मुलांसमोर अक्षय आणि ट्विंकलनं रस्त्यावर असं काही केलं की मुलांनाच लाज वाटू लागली.
ट्विंकल खन्नानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत ती नवरा अक्षयसोबत रस्त्यात चालताना दिसत आहे. मात्र, मध्येच ती त्याच्यासोबत ठुमके देत असल्याचं पाहायला मिळतं. यावेळी त्यांच्यासोबत दोन्ही मुलं आरव आणि नितारा देखील दिसले. त्या दोघांना त्यांच्या आई-वडिलांनी केलेलं हे कृत्य पाहून आश्चर्य झालं. ट्विंकलनं हा व्हिडीओ शेअर करत याविषयी सांगित म्हटलं की अक्षयला मध्येच रस्त्यात डान्स करताना पाहून त्यांच्या मुलांना त्यांची लाज वाटली. त्यासोबत तिनं दुसऱ्या पालकांना विचारलं की मुलांना लाज वाटावी यासाठी ते काय करतात.
दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करत ट्विंकल खन्नानं कॅप्शन दिलं की 'जर तुम्हाला डान्स करता येतो तर पायी काय चालायचं? त्याचे आणखी फायदे तुम्हाला माहित आहेत? त्यांना मुलांना लाज वाटून घेण्याची संधी... पण, खरं तर हे आहे की जेव्हा मुलं तरुणपणात जातात तेव्हा तुमचं तिथे उपस्थित राहणंच त्यांना लाज वाटून देण्यासाठी पुरेसं असतं. तुमच्या मुलांना लाज वाटावी यासाठी तुम्ही काय करता?'
दरम्यान, ट्विंकल खन्नाची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. नेटकऱ्यांना ट्विंकलचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे. तर काही नेटकरी असे आहेत, ज्यांनी व्हिडीओपेक्षा ट्विंकलचं कॅप्शन छान असल्याचं म्हटलं आहे. तर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'मुलांना लाज वाटावी असं काही करायचं असेल तर त्यांच्या मित्रांसमोर त्यांच्या टोपण नावानं हाक मारायची.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'माझ्या नवऱ्यानं माझा हात पकडण्याचा प्रयत्न करणं हेत माझ्या धाकट्या मुलीसाठी लाजीरवाणं असतं.'