मुंबई : अक्षय कुमारचा सध्या एक लूक खूप चर्चेत आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांच्या फॅन क्लबद्वारे एक फोटो शेअर केला जात आहे. ज्यामध्ये तो एका योद्धाच्या रुपात बाल्ड लूकमझ्ये दिसत आहे. असं सांगितलं जातंय की, अक्षयचा हा लूक त्याच्या आगामी 'हाऊसफुल 4' करता आहे. या लूकमध्ये अक्षय कुमारने पूर्णपणे टकलू केलं आहे. त्यांचा हा अवतार बघता चाहते देखील गोंधळले आहेत. आता या फोटोवरून अनेक तर्क वितर्क केले जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र अद्याप या लूकवर शिक्कामोर्तब झालेला नाही की, हा लूक हाऊसफुल 4 मधीलच आहे. मात्र अक्षयचे चाहते या स्टाइलला बघून खूप एक्सायटेड आहेत. पण 'हाऊसफुल 4'चा दिग्दर्शक साजिद खानवर एका लेखिकाने लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. यामुळे अक्षयने या सिनेमाचं शुटिंग थांबवलं आहे. 



आरोपांमध्ये अडकलेल्या साजिद खानला आता हा प्रोजेक्ट सोडावा लागला आहे. त्यामुळे हा सिनेमा आतापासूनच खूप चर्चेत आला आहे. तसेच अक्षय कुमार '2.0' या सिनेमात लवकर रजनीकांतसोबत दिसणार आहे. सिनेमात अक्षय नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.