मुंबई : अक्षय कुमारने चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला आहे. तो त्याच्या चाहत्यांची मनं जिंकण्याची एकही संधी सोडत नाही. अक्षय कुमारने नुकताच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो लांब मोकळ्या केसांमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर  त्याच्या डोळ्यांवर चष्मा आहे आणि त्याने खाकी रंगाचा टी-शर्ट परिधान केला  आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये देवी मंत्र वाजताना दिसत असून अक्षय खूप शांत दिसत आहे.

 

अक्षयला आईची आठवण आली

हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच अक्षय कुमारने लिहिलं आहे की,   'अशीच आज आईची खूप आठवण येत आहे'  अक्षय कुमारच्या आईचं या वर्षी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं. यानंतर तो चांगलाच तुटला होता. अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया या चित्रपट निर्मात्या होत्या. त्यांनी अक्षयचा सूर्यवंशी या चित्रपटाची निर्मितीही केली होती.

 

 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 अक्षय मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे

अक्षय कुमारच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या त्याच्या अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच त्याचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचवेळी अक्षय त्याच्या 'राम सेतू' आणि 'अतरंगी रे' या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान आणि धनुष दिसणार आहेत. याशिवाय त्याच्याकडे 'रक्षाबंधन' हा चित्रपटही आहे.