मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा इंडस्ट्रीतील सर्वात व्यस्त कलाकारांपैकी एक आहे. तो अनेकदा त्याच्या चित्रपटांच्या टीझर, ट्रेलरमुळे चर्चेत असतो. बॅक टू बॅक चित्रपट देणारा अक्षय कुमार अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. आता त्याच्याबद्दल आणखी काही बातम्या येत आहेत. ज्यानुसार बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने नवीन फ्लॅट खरेदी केला आहे. वृत्तानुसार, अक्षय कुमारने एक नवीन फ्लॅट खरेदी केला आहे. ज्याची किंमत करोडो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिसेंबरमध्ये विकलं होतं अंधेरी वेस्टमधील ऑफिस
मात्र, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. यापूर्वी डिसेंबरमध्ये अक्षय कुमारने त्याचं एक ऑफिस विकलं होतं. अक्षय कुमारने डिसेंबर २०२१ मध्ये अंधेरी पश्चिम येथील त्याचं ऑफिस ९ कोटींना विकलं. त्यानंतर आता त्याने नवीन अपार्टमेंट घेतलं आहे. ही बातमी समोर आल्यानंतर अक्षय कुमारचे चाहते खूप उत्सुक आहेत.


7.8 करोड आहे अपार्टमेंटची किंमत
एका रिपोर्टनुसार, अक्षय कुमारने एक नवीन फ्लॅट घेतला आहे आणि त्याच्या नवीन आलिशान फ्लॅटची किंमतही खूप जास्त आहे. रिपोर्टनुसार, त्याच्या या नवीन फ्लॅटची किंमत 7.8 कोटी रुपये आहे. खार पश्चिम येथील जॉय लिजेंड बिल्डिंगच्या 19व्या मजल्यावर त्यांचा नवीन फ्लॅट असल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच त्यांना येथे चार कार पार्किंसाठी जागाही मिळाली आहे.


ही बातमी समोर आल्यानंतर आता अक्षय कुमारचे चाहते त्याच्या या लक्झरी अपार्टमेंटचे फोटो पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. मात्र दुसरीकडे याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही.  अक्षय कुमार हा इंडस्ट्रीतील सर्वात व्यस्त कलाकारांपैकी एक आहे. जो एका वर्षात 1 पेक्षा जास्त चित्रपट करतो. 


अक्षय कुमारचा 'अतरंगी रे' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ज्यामध्ये तो सारा अली खान आणि साऊथ सुपरस्टार धनुषसोबत दिसला होता. याशिवाय त्याच्या आगामी चित्रपटांची यादीही खूप मोठी आहे. त्यात पृथ्वीराज, सेल्फी, ओएमजी 2, गोरखा, रक्षा बंधन, बच्चन पांडे, मिशन सिंड्रेला आणि राम सेतू या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे.