मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar)  त्याच्या आगामी 'रक्षा बंधन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. सध्या अक्षय चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, अक्षय चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'सुपरस्टार सिंगर 2' या शोमध्ये पोहोचला होता. यावेळी अक्षय भावूक झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमार हा ‘सुपरस्टार सिंगर 2’ मध्ये पाहुणा म्हणून दिसणार आहे. त्याचा प्रोमोही सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हारल झाला आहे. 'रक्षाबंधन' स्पेशल एपिसोडमध्ये अभिनेता त्याच्या चित्रपटातील चार बहिणींसोबत पोहोचला. येथे त्याचे जोरदार स्वागत केले जाते. त्यानंतर एका लहान मुलाने 'फूलों का तारों का सबका कहना है…’ हे गाणं अभिनेत्याला डेडिकेट केलं आणि अक्षय आणि त्याच्या खऱ्या आयुष्यातील बहिणीचे काही न पाहिलेले फोटो पडद्यावर दिसू लागतात. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


गाणं आणि फोटो पाहून अक्षय भावूक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. व्हिडिओमध्ये अक्षय त्याच्या रुमालानं अश्रू पुसताना दिसत आहे. अक्षय बोलतो की तो त्याच्या बहिणीला देवी बोलतो. आम्ही छोट्या घरात रहायचो. या देवीनं आमच्या आयुष्यात एण्ट्री केल्यानंतर आमचं आयुष्य बदललं. बहिणीच्या नात्यापेक्षा मोठे नाते नाही.


अक्षय कुमार व्यतिरिक्त भूमी पेडणेकर आनंद एल राय दिग्दर्शित 'रक्षाबंधन' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर सहजमीन कौर, दीपिका खन्ना, सादिया खातीब आणि स्मृती श्रीकांत या कलाकारांच्या बहिणींच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा हिमांशू शर्मा आणि कनिका धिल्लन यांनी लिहिली आहे. भावा-बहिणीच्या नात्यावर आधारित, चित्रपटाची गाणी हिमेश रेशमियाने गायली आहेत आणि गीते इर्शाद कामील यांनी लिहिली आहेत.


अक्षयची बहीण अलका भाटिया बद्दल बोलायचे झाले तर, तिने 23 डिसेंबर 2012 रोजी सुरेंद्र हिरा नंदीशी लग्न केले. तिचा पती 'हाउस ऑफ हिरानंदानी' चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. 'हाऊस ऑफ हिरानंदानी' हा भारतातील रिअल इस्टेट आणि हाउसिंग क्षेत्रात गुंतलेला एक अग्रगण्य व्यवसाय समूह आहे. अलका खूप शांत आहे, जास्त वेळ घरी घालवायला आवडते आणि लाइमलाइटपासून दूर राहते.