VIDEO : आगीच्या ज्वाळांसोबतच खिलाडी कुमारचा रॅम्प वॉक
अक्षय अॅमोझॉन प्राइम व्हिडिओसह `द एन्ड` नावाची वेबसीरीज करत आहे.
मुंबई : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार काही ना काही स्टन्ट करत नेहमीच प्रेक्षकांना आश्चर्यचकीत करत असतो. यावेळी अक्षय कुमारने चक्क स्वत:च्या शरीरालाच आग लावली आहे. अक्षयने शरीराला आग लावत रॅम्प वॉक केला आहे. शरीरावर आग आणि चेहऱ्यावर हास्य असा रॅम्प वॉक करत अक्षयने सर्वानाच पुन्हा एकदा खिलाडी असल्याचं दाखवून दिलं आहे. अक्षयने हा रॅम्प वॉक करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अक्षय कुमारने वेब सीरीजमध्ये पदार्पण केलं आहे. अक्षय अॅमोझॉन प्राइम व्हिडिओसह 'द एन्ड' नावाची वेबसीरीज करत आहे. त्याच सीरीजच्या घोषणेवेळी अक्षयने हा स्टन्ट सादर केला. अक्षयने 'द एन्ड' ही वेब सीरीज ह्यूमन स्टोरी असून यात मोठे अॅक्शन सीन असल्याचं म्हटलं. मी कधीच अॅक्शनपासून लांब गेलो नाही. हे माझ्यात आधीपासून आहे. मी स्वत:ला आधी स्टंट मॅन नंतर अभिनेता मानत असल्याचंही त्यांने यावेळी म्हटलं.
अक्षयने केलेल्या या स्टन्टनंतर अॅमेझॉन प्राइमची ही वेब सीरीज प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळवते हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे. २०१९ हे वर्ष अक्षयसाठी खास ठरणार असंच दिसत आहे. यंदाच्या वर्षात अक्षयचे गुड न्यूज, केसरी आणि हाऊस फुल हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे हे तीनही चित्रपट बॉक्सऑफिसवर काय कमाल करतात हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.