मुंबई : नॅशनल पुरस्कार विजेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाचा दिग्दर्शक राघव लॉरेंस (Raghava Lawrence) यांनी एकत्र येत चेन्नईमधील तृतियपंथींसाठी घरं साकारण्याचा विडा हाती घेतला आहे. या कामासाठी अक्षयने दीड कोटी रूपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षयच्या या कामामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शिवाय 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाच्या दिग्दर्शकाने देखील त्याचे आभार मानले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईमध्ये फक्त तृतियपंथींसाठी तयार होणारी ही पहिली इमारत असणार आहे. राघवने फेसबुकच्या माध्यमातून ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. 'आमच्या दोघांमध्ये जो विश्वास आहे त्याला आता १५ वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यासाठी आम्ही अत्यंत आनंदी आहोत. त्यामुळे हे वर्ष मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तृतियपंथींना राहण्यासाठी घर देणं त्यामुळे त्यांचा विकास होईल.'