मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या बोल्ड स्टाइल आणि बिंधास्तपणासाठी ओळखला जातो. अक्षयच्या बिंधास्त आणि मस्त स्टाइलमुळे अभिनेत्री नुसरत भरुचा अशा पद्धतीने कॅमेऱ्यासमोर आली की, आता सगळ्यांमध्येच याची चर्चा आहे. नुसरत आणि अक्षय कुमार त्यांच्या आगामी 'सेल्फी' चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. दोघंही या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये हे दिसत आहे की, सोशल मीडियावर सेलिब्रिटी कसे वेगळे दिसतात आणि खऱ्या आयुष्यात कसे वेगळे दिसतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेत्री नुसरत भरुचा फ्लाइटमध्ये बसून खूप मस्ती करत हाताने जेवण जेवत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अक्षय कुमार तेथे पोहोचतो आणि नुसरतसोबत सेल्फी काढू लागतो यानंतर अभिनेत्री त्यासा सेल्फि काढू नको असं सांगते. यापुढे ती हात पुसायला लागते. आणि हातात चमचा घेवून जेवू लागते आणि कॅमेराकडे बघत स्टायलिश पोझ देते.


यावर अक्षय तिला विचारतो, 'ती चमच्याने नाही तर हाताने का जेवत आहे?' यानंतर अभिनेत्री अक्षयकडे लक्ष न देता कॅमेऱ्यासमोर एक्सप्रेशन देते. आणि सेल्फी काढते. इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. याला कॅप्शन देत अभिनेत्रीने लिहिलं आहे की, Instagram vs Reality.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या सिनेमात दिसणार अक्षय-नुसरत
 अक्षय आणि नुसरत राम सेतू आणि सेल्फी या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. सेल्फीचं शूटिंग सुरू असतानाच राम सेतूचं शूटिंग पूर्ण झालं आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी आणि डायना पेंटी देखील दिसणार आहेत. सेल्फी हा 2019 मल्याळम कॉमेडी 'ड्रायव्हिंग लायसन्स' चा रिमेक असल्याचं सांगितलं जात आहे.