Akshay Kumar च्या बॉडीगार्डनं चाहत्याला धक्का देताच... Video पाहून तुम्हाला बसेल धक्का
Akshay Kumar चा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Akshay Kumar Fan Video : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे (Akshay Kumar) लाखो चाहते आहेत. अक्षय हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतो. सध्या अक्षय चर्चेत असण्याचे कारण त्याचा आगामी चित्रपट 'सेल्फी' (Selfie) आहे. या चित्रपटात अक्षयसोबत इमरान हाश्मी (Emraan Hashmi) देखील दिसणार आहे. यासाठी अक्षय आणि इरमान या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील करत आहेत. त्याच निमित्तानं अक्षय पुण्यात पोहोचला होतो. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी अक्षय अनेक चाहत्यांना भेटला पण याच दरम्यान, एका चाहत्यानं असं काही केलं की त्याच्या बॉडीगार्डनं त्याला तेथून काढून टाकलं. मात्र, नंतर अक्षयनं जे केलं ते पाहून नक्कीच सगळ्यांना आश्चर्य होईल.
अक्षयच्या फॅन पेजनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओत अक्षयला भेटण्यासाठी त्याचा एक चाहता बॅरिकेट ओलांडून जातो. मात्र, त्याला पाहताच तिथे उपस्थित असलेले अक्षयचे बॉडीगार्ड त्याच्या चाहत्याला मागे ढकलतात. बॉडीगार्डनं केलेलं हे कृत्य पाहता अक्षय त्याच्या त्या चाहत्याजवळ जातो आणि त्याला मिठी मारतो. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अक्षयनं काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Akshay Kumar Viral Video)
अक्षय कुमारचा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी अक्षयच्या बॉडीगार्डला ट्रोल केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत बॉडीगार्ड इतक्या गर्दीत अक्षयच्या सुरक्षेचं काम करत आहेत. इतक्या गर्दीत अक्षयची सुरक्षा करणं हेच त्याचं काम आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, चाहत्यानं इतक्या गर्दीत बॅरीकेटवरून उडी मारत जाणं योग्य नाही.
हेही वाचा : हीरामंडी खरंच Redlight Area होती की करण्यात आली? 'तो' इतिहास खडबडून जागे व्हाल
दरम्यान, अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी हे पहिल्यांदा सेल्फी या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 24 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. हा चित्रपट मल्याळम चित्रपट ड्रायव्हिंग लायसंसचा हिंदी डब आहे.