मुंबई : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या कामाच्या डेडिकेशनसाठी चांगलाच लोकप्रिय आहे. शूटिंग करत असताना तो टीममधील सर्वांनाच वळण लावताना नेहमीच बघायला मिळतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता एका शूटिंगवेळी असं काही झालं की, अक्षय वैतागून शूटिंग सोडून घरी परत गेला. 


झालं असं की, अक्षय कुमार हा सध्या त्याच्या आगामी ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोचं शूटिंग करत आहे. यात तो होस्ट असणार आहे. या शूटिंग दरम्यान फारच वैतागलेला दिसला आणि याचं कारण ठरली आहे अभिनेत्री एली अवराम. 


बॉलिवूडलाईफ डॉट कॉम या वेबसाईटने दिलेल्या वॄत्तानुसार, एली सुद्धा हा शो होस्ट करताना दिसणार आहे. याआधी एली ‘बिग बॉस’मध्येही दिसली होती. एलीचं हिंदी फारच कच्च आहे. त्याकारणाने तिला अनेक डायलॉग्स बोलण्यात अडचण येत होती. त्यामुळे शूटिंग दरम्यान एली अनेक रिटेक्स घेत होती. 


यामुळे झालं असं की, शोचं शूटिंग चांगलंच लांबलं. याने अक्षय वैतागला. इतकेच काय तर अक्षयने मेकर्सना स्पष्ट सांगितलं की, आधी त्याचे सीन्स शूट करून घ्या. नंतर एलीला बोलवून तिचं शूट करा.  


आता अशी बातमी समोर येत आहे की, या शोमध्ये एलीसोबत आणखी एक होस्ट दिसणार आहे. जेणेकरून एलीला तिची मदत होईल. सुनील ग्रोव्हर यात दिसणार असेही बोलले जात आहे. तसेच मनीष पॉल याचंही नाव चर्चेत आहे.