Akshay Kumar gets Indian citizenship : आज सगळेच स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. सगळ्यांनी सोशल मीडियावर आपल्या ध्वजाचा फोटो डीपीवर ठेवला आहे, तर अनेकांनी आज ध्वजारोहन झाल्यानंतर त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारनं आज त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तर त्याच्या नागरिकत्वावरून ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. अक्षय कुमार हा अखेर भारतीय नागरिक झाला आहे. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी बातमी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमारनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एका भारतीय डॉक्युमेंटला हातात धरून अक्षय कुमारनं फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अक्षयनं कॅप्शन दिलं की मनापासून आणि नागरिकत्व, दोघांनी भारतीय. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद! अक्षयनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यावर अनेकांनी 



दरम्यान, बऱ्याच काळापासून भारतीय नागरिकत्व घेण्याचा प्रयत्न करत होता. कारण त्याच्याकडे ते नव्हते. अक्षय कुमारकडे भारतीय नागरिकत्व नाही म्हणून त्याला अनेकांनी ट्रोल केलं होतं. अक्षयला अनेकांनी कॅनडा कुमार हा टॅग देखील दिला होता. त्याला ट्रोल करत लोक त्याच्या चित्रपटांवर देखील निशाना साधायचे. त्यामुळे त्याच्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर देखील त्याचा परिणाम होतो असे अनेकांचे म्हणणे होते. नेटकरी म्हणायचे की तू भारतात काम करतोस, इथे पैसे कमावतोस, पण तुझ्याकडे भारताचे नागरिकत्व नाही. तू दुसऱ्या देशाचा नागरीक आहेस.


हेही वाचा : OMG 2 चित्रपटात अक्षयनं केलं 'गदर 2' चं प्रमोशन? पाहून प्रेक्षकही हैराण


अक्षय कुमारनं केलेलं ट्वीट पाहून नेटकऱ्यांनी त्याला शुभेच्छा देत त्याला भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, हेटर्सच्या आत्म्याला शांती मिळो. दुसरा नेटकरी म्हणाला, आता तुम्हाला कॅनडाला जा असं काही लोक कसं बोलतील. तिसरा नेटकरी त्याला शुभेच्छा देत म्हणाला, राजीव हरी ओम भाटिया उर्फ अक्षय कुमारला खूप खूप शुभेच्छा. आणखी एक नेटकरी शुभेच्छा देत म्हणाला, राजीव भाऊ खूप खूप शुभेच्छा. दुसरा नेटकरी म्हणाला, अक्की पाजी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पहिले पण भारतीय होतात तर आजही भारतीय आहात. तुम्ही या देशासाठी आणि भारतीय सेनेसाठी खूप काही केलं आहे. खूप खूप प्रेम.