मुंबई : प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारने स्वता:च्या खर्चातून जुहू समुद्र किनाऱ्यावर बायो टॉयलेट बांधले आहे. अक्षय कुमार याने जुहू समुद्र किनारी बायो टॉयलेट उभारण्यासाठी १० लाख रुपयांची मदत केली आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारची पत्नी अभिनेत्री टिंवकल खन्नाने ट्विटरवरुन जुहू समुद्र किनाऱ्यावरचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये एक व्यक्ति उघड्यावर शौच करताना दिसत होती.


सिनेमापुरताच मर्यादित नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुहू किनारा हागनदारी मुक्त व्हावा, हा यामागील उद्देश् आहे. काही दिवसांपूर्वी टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमाद्वारे अक्षय कुमारने शौचाल्याचा प्रश्न सर्वांसमोर मांडला होता. पण फ़क़्त सिनेमापुरतेच मर्यादित न राहता समाजासाठी काहीतरी करण्याची आवड असल्यामुळे अक्षय कुमारने समाजकार्य केले आहे. या बायो टॉयलेट शौचालयात तीन महिला आणि तीन पुरुषांसाठी शौच कुपाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिकांना व पर्यटकांना लघुशंकेसाठी वेगळी व्यवस्था केली आहे. बायोटॉयलेट उभारताना समुद्र किनारी दुर्गंधी पसरू नये याकरिता बायो डायजेस्टर वापरण्यात आला आहे.


अक्षय कुमारचं कौतूक


अक्षय कुमार महापालिकेच्या मदतीने जुहू प्रमाणेच वर्सोवा किनाऱ्यावर देखील बायोटॉयलेट उभारण्यात येणार आहे. या कार्यासाठी अक्षय कुमारला युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची मदत मिळणार आहे. अक्षय कुमारने उचललेल्या या अभिनय पावलामुळे त्याचे सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे.