COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार लवकरच 'गोल्ड' या सिनेमांत पाहायला मिळत आहे. सिनेमाच्या या ट्रेलरला बघून तुमच्यातील देशभक्ती नक्की जागी होईल. या सिनेमाची गोष्ट हॉकी खेळाडूच्या खऱ्या जीवनावर आधारित आहे. ज्या व्यक्तीने स्वतंत्र भारतात सर्वात पहिलं सुवर्ण पदक हॉकीमध्ये पटकावलं होतं. आणि भारताचं नाव उंच केली होती. गोल्ड जिंकण्याचं स्वप्न बाळगलेल्या हॉकी खेळाडूच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. या ट्रेलरमधून अक्षयसोबत अनेक कलाकार दिसत आहे. 


आपल्या देशात ऑल्मपिककरत 'गोल्ड' जिंकण्याची सुरूवात 1936 पासून झाली होती. मात्र गुलाम भारताचा हा प्रवास आणि त्यांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी 12 वर्षाचा काळ लागला होता. भारताने 12 ऑगस्ट 1948 रोजी ऑल्मपिक करता पहिलं सुवर्ण पदक जिंकल आहे.  


टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय 'गोल्ड' या सिनेमातू बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. ट्रेलरमधील मौनीचा अभिनय पाहून चाहते खूष झाले आहेत. अक्षय कुमार देखील ट्रेलरमध्य एकदम मस्त दिसत आहे.