जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन भारतीय रुळांवर कधी धावणार? जाणून घ्या

भारतीय रेल्वेने आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे.

| Jan 10, 2025, 18:33 PM IST

Worlds Most Powerful Hydrogen Train:भारतीय रेल्वेने आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे.

1/9

जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन भारतीय रुळांवर कधी धावणार? जाणून घ्या

Worlds Most Powerful Hydrogen Train indian Railway Upgrad infra Marathi News

Worlds Most Powerful Hydrogen Train: भारताने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन विकसित केली आहे. भारतीय रेल्वेने विकसित केलेले हायड्रोजन इंधनावर चालणारे रेल्वे इंजिन हे जगातील सर्वात जास्त हॉर्स पॉवरचे इंजिन आहे.

2/9

सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन

Worlds Most Powerful Hydrogen Train indian Railway Upgrad infra Marathi News

भारतीय रेल्वेने आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. भारताने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन विकसित केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी याबद्दल माहिती दिली. 

3/9

सर्वात जास्त हॉर्स पॉवर

Worlds Most Powerful Hydrogen Train indian Railway Upgrad infra Marathi News

भारतीय रेल्वेने विकसित केलेले हायड्रोजन-इंधनावर चालणारे रेल्वे इंजिन हे जगातील सर्वात जास्त अश्वशक्तीचे इंजिन आहे.

4/9

इंजिनची क्षमता

Worlds Most Powerful Hydrogen Train indian Railway Upgrad infra Marathi News

जगात फक्त 4 देश असे ट्रेन इंजिन बनवतात. ते देखील 500 ते 600 हॉर्सपॉवर दरम्यान इंजिन तयार करतात. तर भारतीय रेल्वेने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या इंजिनची क्षमता 1200 अश्वशक्ती आहे. जी या श्रेणीतील आतापर्यंतची सर्वाधिक आहे.

5/9

पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान

Worlds Most Powerful Hydrogen Train indian Railway Upgrad infra Marathi News

या इंजिनच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे आणि सिस्टम इंटिग्रेशनचे काम प्रगतीपथावर आहे. हे इंजिन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. तांत्रिक स्वावलंबनाच्या दिशेने भारताचे एक मोठे पाऊल असल्याचे रेल्वे मंत्री म्हणाले.

6/9

पर्यावरण संरक्षणासाठी वरदान

Worlds Most Powerful Hydrogen Train indian Railway Upgrad infra Marathi News

हे हायड्रोजन ट्रेन इंजिन पर्यावरण संरक्षणासाठी देखील वरदान ठरेल. हायड्रोजन इंधन पेशींचा वापर करून या ट्रेनमध्ये शून्य कार्बन उत्सर्जन होईल. यामुळे भारताची स्वच्छ ऊर्जा आणि हरित वाहतुकीचे उद्दिष्ट्य साध्य होण्यास मदत होईल.

7/9

पहिली चाचणी

Worlds Most Powerful Hydrogen Train indian Railway Upgrad infra Marathi News

या इंजिनची पहिली चाचणी हरियाणाच्या जिंद-सोनीपत मार्गावर होईल. 89 किमी लांबीच्या या मार्गावर हायड्रोजन ट्रेनची चाचणी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

8/9

2800 कोटी रुपयांचे बजेट

Worlds Most Powerful Hydrogen Train indian Railway Upgrad infra Marathi News

रेल्वे मंत्रालयाने 2023-24 या आर्थिक वर्षात 35 हायड्रोजन इंधन सेल गाड्या विकसित करण्यासाठी 2800 कोटी रुपयांचे बजेट वाटप केले आहे.

9/9

चाचणी

Worlds Most Powerful Hydrogen Train indian Railway Upgrad infra Marathi News

भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन 2025-26 पर्यंत सेवेत येण्याची अपेक्षा आहे. त्याची चाचणी या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल.