The Kapil Sharma Show : अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कपिल शर्मा (Kapil Sharma) या दोघांची एक घट्ट मैत्री आहे. द कपिल शर्मा शोच्या (The Kapil Sharma Show New Season) नव्या सीजनची नुकतीच सुरूवात झाली. या शोच्या पहिल्याच एपिसोडसाठी कपिलने आपल्या खास मित्राला म्हणजे अक्षय कुमारला आमंत्रित केलं होतं. त्यावेळी कपिल आणि अक्षय या दोघांची चांगलीच केमेस्ट्री जुळून आल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी, कपिल शर्मा सीरीयल किलर असल्याचा आरोप अक्षयने केलाय. (bollywood actor akshay kumar kidding with kapil sharma in the kapil sharma show)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमारचा कठपुतली हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय The Kapil Sharma Show मध्ये आला होता. त्यावेळी दरवेळीप्रमाणे मस्ती पहायला मिळाली. अक्षय आणि कपिलमध्ये चेष्टा मस्करी सुरू झाली. त्यावेळी अक्षयने कठपुतली सिनेमाविषयी माहिती देताना कपिलला टोले लगावले.


"कठपुतली सिनेमामध्ये एका सायको सिरीयल किलर शोधण्याचं काम अक्षय पाजी करतात", असं कपिल म्हणाला. पण खरं तर तुम्हाला काय वाटतं सीरीयल किलर कोण असेल?, असा सवाल कपिलने विचारला. कपिलने विचारलेल्या प्रश्नाचा रोख अक्षयने ओळखला आणि उत्तर दिलं.


सर्वात मोठा सीरियल किलर हा कपिलच आहे. तु कितीजणांचे शो संपवले?, असा प्रतिप्रश्न अक्षयने कपिलला विचारला. अक्षयच्या प्रश्नावर कपिल काहीसा बुचकाळ्यात पडला. सीरियल ब्रेक घेतात, असं कपिल म्हणाला. मात्र, अक्षयच्या प्रश्नाचा मारा संपला नाही. अक्षयने सीरियल ब्रेक का घेतात?, असा आणखी एक सवाल उपस्थित केला. त्यावर माझी देखील फॅमिली आहे, असं कपिलने उत्तर दिलं. 


जेव्हा शो करत असतो तेव्हा फॅमिली कुठे जाते?, असं म्हणत अक्षय कपिलला प्रश्नाच्या जाळयात अडकवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी तु मला फसवण्यासाठी आलाय का, असं म्हणत एकमेकांचा पाय खेचण्याचा कार्यक्रम बंद होतो.


दरम्यान, या एपिसोडचा अन्सेन्सर्ड व्हीडीओ युट्यूवर शेअर करण्यात आलाय. यामध्ये कपिल आणि अक्षय एकमेकांची मस्करी करताना दिसत आहे. अक्षय कुमारचा नवा थ्रिलर चित्रपट अनेकांना आवडलेला आहे. सायको सिरीयल किलरची रोमांचक कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळेल.