शेतकऱ्यांनंतर भारतीय लष्करासंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय! 30 जूनपासून...

Modi Government Big Decision About Indian Army: तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला. त्यानंतर आता मोदी सरकारने भारतीय लष्करासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊयात हा निर्णय काय आहे.

| Jun 12, 2024, 16:24 PM IST
1/8

Modi Government Big Decision About Indian Army

देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी रात्री केली.   

2/8

Modi Government Big Decision About Indian Army

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांची जागा घेतील.  

3/8

Modi Government Big Decision About Indian Army

जनरल पांडे 30 जून 2024 रोजी निवृत्त होत आहेत.  

4/8

Modi Government Big Decision About Indian Army

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती करताना केंद्र सरकारने सेवाज्येष्ठतेला प्राधान्य दिलं आहे.  

5/8

Modi Government Big Decision About Indian Army

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे सध्या लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.  

6/8

Modi Government Big Decision About Indian Army

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, "सरकारने उपलष्करप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची 30 जूनच्या दुपारपासून देशाचे नवे लष्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे."  

7/8

Modi Government Big Decision About Indian Army

सरकारने गेल्या माहिन्यामध्ये जनरल पांडे यांच्या सेवानिवृत्तीचा त्यांचा कार्यकाळ एका महिन्याने वाढवला. जनरल पांडे 31 मे रोजी निवृत्त होणार होते. जनरल पांडे यांचा कार्यकाळ वाढविण्याच्या निर्णयामुळे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना सर्वोच्च पदासाठी दुर्लक्षित केले जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.

8/8

Modi Government Big Decision About Indian Army

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यानंतर भारतीय लष्करामधील सर्वात वरिष्ठ अधिकारी हे दक्षिण कमांडचे प्रमुख असलेले लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह हे आहेत.