मुंबई : दिग्दर्शक करण जोहर हा बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. करण 'कॉफी विथ करण' या शोमुळे चर्चेत आहे. 'कॉफी विथ करण' चे हे ७ वे पर्व आहे. 'कॉफी विथ करण'चे दोन एपिसोड प्रदर्शित झाले आहेत. तर गुरुवारी प्रदर्शित होणाऱ्या एपिसोडमध्ये बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हजेरी लावणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षयने या आधी ही बऱ्याचवेळा या शोमध्ये हजेरी लावली आहे, तर समांथा पहिल्यांदा शोमध्ये दिसणार आहे. सध्या शोचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये अक्षयने समांथाला उचलून घेत धम्माकेदार एण्ट्री केल्याचे दिसत आहे. यावेळी करणने समांथाला प्रश्न विचारला की 'जर तिच्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीच्या बॅचलरेट पार्टीमध्ये डान्स करण्यासाठी कोणत्या दोन बॉलिवूड हंकला बोलवायचं असेल तर कोणाला बोलवणार? यावर उत्तर देत समांथा 'रणवीर सिंग आणि रणवीर सिंग.' 



पुढे करणने अक्षयला क्रिस रॉक आणि विल स्मिथ यांच्या ऑस्कर कॉन्ट्रोव्हर्सीविषयी प्रश्न विचारतं बोलतो, 'जर क्रिस रॉकने ट्विंकलविषयी असा विनोद केला असता तर तू काय केलं असतं? यावर अक्षय म्हणाला, 'मी त्याच्या अंत्यसंस्काराचा संपूर्ण खर्च उचलला असता. हे पाहिल्यानंतर गुरुवारी प्रदर्शित होणारा एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. गुरुवारी हा एपिसोड संध्याकाळी ७ वाजता डिज्नी प्लस हॉट स्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.