मुंबई : अभिनेता अक्षय कुमार नेहमी सामाजिक मुद्द्यांवर आपलं परखड मत मांडत असतो. त्याचे अनेक चित्रपट सामाजिक मुद्द्यांवर आधारलेले आहेत. त्यामुळे तो लवकरच राजकारणात सक्रिय होईल अशा चर्चा रंगत असतात. परंतु या सर्व चर्चांना खुद्द अक्षयने पूर्णविराम दिला आहे. आपल्या एका वक्तव्यात त्याने राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली आहे. अक्षयने पंतप्रधानांना अनेक मुद्द्यांवर बोलतं केल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर अक्षयच्या काही प्रश्नांवर मोदी खळखळून हसतानाही पाहायला मिळत आहेत. 


अक्षय कुमार आणि पंतप्रधान मोदींचे चांगले संबंध पाहूण नेहमी त्याला त्याच्या राजकारणातील एन्ट्रीबद्दल विचारणा करण्यात येते. तेव्हा आपण चित्रपटांमध्ये खुश असल्याचे सांगितले आणि आपला राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचे देखील त्याने सांगितले. 


'मला राजकारणात येण्याची मुळीच इच्छा नाही. मला कायम आनंदी राहायचं आहे. राजकारणाबद्दल मी कधीच विचार करत नाही. चित्रपटांमध्ये काम करण्यात माझा रस आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या परिने देशासाठी काहीतरी चांगलं करतो.' असं म्हणत त्याने राजकारण माझं काम नसल्याचं त्याने सांगितलं आहे. 


सध्या अक्षय त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. 'गुडन्यूज', 'सुर्यवंशी', 'लक्ष्मीबॉम्ब' अशा एकापेक्षा एक चित्रपटांच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 'गुडन्यूज' चित्रपटात तो अभिनेत्री करिना कपूर खानसोबत स्क्रिन शेअर करताना झळकणार आहे.