`मी मेलो नाही...`, एकामागे एक फ्लॉप चित्रपट देण्यावर अक्षय कुमारची खोचक प्रतिक्रिया
Akshay Kumar on Flop Movies : अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एकामागे एक फ्लॉप चित्रपट देण्यावर वक्तव्य केलं आहे.
Akshay Kumar on Flop Movies : काल म्हणजेच शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी अक्षय कुमारनं त्याच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी असं काही वक्तव्य केलं की सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. 'खेल खेल में' या चित्रपटाचा काल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अक्षयनं त्याच्या अपयशी ठरलेल्या चित्रपटांचा उल्लेख केला. त्यावेळी त्यानं असं काही म्हटलं की त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
शुक्रवारी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'खेल खेल में' या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रेलर लॉन्चच्या निमित्तानं त्याची टीम देखील तिथे उपस्थित होती. या दरम्यान त्याचे अनेक चित्रपट जे अपयशी ठरले किंवा ज्यांनी बॉक्स ऑफिसवर काही कामगिरी केली नाही. त्यावर वक्तव्य केलं आहे. त्यानं म्हटलं की अभिनेता एका चित्रपटात अपयशी होतो, तर दुसऱ्या चित्रपटात आणखी मेहनत करतो, तो हार मानत नाही.
ट्रेलर लॉन्च दरम्यान, अक्षयनं त्याला एकामागे एक येणाऱ्या अपयशांवर वक्तव्य केलं. तेव्हा अक्षय याविषयी पुढे सविस्तर सांगत म्हणाला, 'चार ते पाच चित्रपट हे चालले नाही. मला सॉरी यार, चिंता करू नको. सारखे मेसेजेस येत होते. माझे निधन झाले नाही. मला असे मेसेज येत होते जे श्रद्दांजली देत असल्यासारखे वाटतात.' एका पत्रकारानं तर इतकं देखील लिहिलं की 'चिंता करू नकोस, तू कमबॅक करशील.' मी उत्तर दिलं 'मी गेलोच कुठे?'
अक्षयनं त्याच्या करिअरच्या वचनबद्धतेवर जोर देत सांगितलं की तो इथे आहे आणि काहीही झालं तरी मी काम करेन. याविषयी सांगत अक्षय पुढे म्हणाला, 'मी इथे आहे आणि कोणी काहीही बोललं तरी मी कायम काम करत राहिन. तुम्हाला उठावं लागेल, व्यायाम करावा लागेल आणि मग त्यानंतर कामावर जावं लागेल. मी जितकं काही कमावतो, माझ्या मेहनतीवर कमावतो. मी तोपर्यंत काम करत राहिनं जोपर्यंत मी थकलो असं मला वाटतं नाही.'
हेही वाचा : दीपिकानं दिला मुलाला जन्म? बाळाला हातात घेतलेला रणवीर सिंगचा PHOTO VIRAL
'खेल खेल में' या चित्रपटाच्या ट्रेलरविषयी बोलायचं झालं तर हा तीन मिनिटांपेक्षा जास्त मोठा ट्रेलर आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला काही मित्र त्यांच्या पार्टनरसोबत एक गेम नाइटसाठी ते एकत्र येतात. महिला या चर्चा करतात की कशा प्रकारे पुरुषांकडे काही गुपीतं असतात. 'खेल खेल में' हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.