मुंबई : अक्षय कुमारने बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जातो. आता अक्षय कुमार एकापाठोपाठ एक हिट सिनेमे देत आहे. अक्षयचा आताचा सिनेमा 'मिशन मंगल'ने 200 करोड रुपयांची कमाई केली आहे. अक्षयचा हा पहिला सिनेमा आहे ज्याने हा आकडा पार केला आहे. आता 26 ऑक्टोबरला अक्षयचा आगामी सिनेमा 'हाऊसफुल्ल 4' रिलीज होत आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण अक्षयच्या आयुष्यात एक असा काळ होता जेव्हा त्याचे एकापाठोपाठ एक सिनेमे फ्लॉप होत होते. अक्षयने या दिवसांबाबत खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

HT GIFA लाँचच्या कार्यक्रमात अक्षय कुमारने आपल्या आगामी सिनेमासोबत आपल्या करिअरच्या काही गोष्टी शेअर केल्या. अक्षय म्हणाला की, एक वेळ अशी होती जेव्हा माझे 14 सिनेमे फ्लॉप झाले होते. तेव्हा मला वाटलं देखील की, एक अभिनेता म्हणून माझं करिअर संपलं आहे. 


पण पुढे अक्षय म्हणाला की, या 14 फ्लॉप सिनेमांमधून मी खूप काही शिकलो आहे. त्याकाळात मी स्वतः खूप हरल्यासारखं अनुभवत होतं. पण त्यावेळी मला माझी मार्शल आर्टची ट्रेनिंग कामाला आली. ही ट्रेनिंग तुम्हाला नियमात रहायला शिकवते. 


अक्षय कुमार सध्या 'हाऊसफुल्ल 4'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पुढे अक्षय म्हणाला की, मला जेव्हा पण बिझी शेड्युलमधून वेळ हवा असतो. तेव्हा मी "हाऊसफुल्ल' सिनेमा करून टाकतो. सेटवर देखील असंच हसरं खेळतं वातावरण असल्याचं तो म्हणाला.